SCO Summit 2022 : अन्न संकट, युक्रेन युद्ध अन्...; SCO समिटमधील मोदींचे मुद्दे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Narendra Modi

SCO Summit 2022 : अन्न संकट, युक्रेन युद्ध अन्...; SCO समिटमधील मोदींचे मुद्दे

PM Modi In SCO Summit : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एससीओ समिटमध्ये सहभागी होण्यासाठी उझबेकिस्तान येथे गेले आहेत. येथे त्यांनी सहभागी विविध देशातील प्रमुख नेत्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी जागतिक अन्न संकट, युक्रेन युद्ध अशा अनेक मुद्द्यांवर भारताची भूमिका स्पष्ट केली. मोदींनी या परषेदेत नेमके कोणकोणत्या मुद्द्यांवरभाष्य केले ते थोडक्यात जाणून घेऊया.

परिषदेला संबोधित करताना मोदींनी हिंदीमध्ये भाषण केले. यावेळी त्यांनी भारताची अर्थव्यवस्था यावर्षी ७.५ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा असल्याचे सांगितले. भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचा आनंद असल्याचेही ते म्हणाले. भारत प्रत्येक क्षेत्रात नाविन्यपूर्णतेला पाठिंबा देत असून, आज भारतात 70 हजारांहून अधिक स्टार्टअप्स आहेत. ज्यामध्ये 100 हून अधिक युनिकॉर्न असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या क्षेत्रातील भारताचा अनुभव SCO देशांसाठी उपयुक्त ठरू शकतो असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

हेही वाचा: देवरूख ः जिल्ह्यात शिंदे गटाची ताकद वाढवण्यासाठी उद्योगमंत्र्यांचे प्रयत्न

पीएम मोदी म्हणाले, जग कोरोना विषाणूच्या साथीवर मात करत आहे. कोविड आणि युक्रेनच्या संकटामुळे जागतिक पुरवठा साखळीत अनेक व्यत्यय आले. मात्र, आम्हाला भारताला उत्पादन केंद्र बनवायचे आहे. आम्ही स्टार्टअप्स आणि इनोव्हेशनवर विशेष कार्यगट स्थापन करून SCO सदस्य देशांसोबत आमचा अनुभव शेअर करण्यास तयार आहोत.

हेही वाचा: Video : भाजपनं केजरीवालांसमोर टेकले हात; थेट घरच्यांनाच केली विनंती

एप्रिल 2022 मध्ये WHO ने गुजरातमध्ये पारंपारिक औषधांच्या जागतिक केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. हे WHO द्वारे पारंपारिक औषधांसाठीचे पहिले आणि एकमेव जागतिक केंद्र असून, पारंपारिक औषधांवरील नवीन SCO वर्किंग ग्रुपसाठी भारत काम करण्यास तयार असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले.

Web Title: Sco Summit 2022 Key Points Of Pm Narendra Modi Speech

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..