अंटार्क्‍टिक महासागरावर सर्वांत मोठे 'सागरी उद्यान'

वृत्तसंस्था
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

सिडने - अंटार्क्‍टिक महासागरावर जगातील सर्वांत मोठे "सागरी उद्यान' करण्यास 24 देश आणि युरोपियन युनियनने तयारी दर्शविली आहे. महासागराच्या एकूण 1.55 दशलक्ष चौरस किलोमीटर परिसरात हे भव्य उद्यान असेल.

सिडने - अंटार्क्‍टिक महासागरावर जगातील सर्वांत मोठे "सागरी उद्यान' करण्यास 24 देश आणि युरोपियन युनियनने तयारी दर्शविली आहे. महासागराच्या एकूण 1.55 दशलक्ष चौरस किलोमीटर परिसरात हे भव्य उद्यान असेल.

अंटार्क्‍टिक महासागर संवर्धन आयोगाच्या सूत्रांनी हॉबर्ट (ऑस्ट्रेलिया) येथे सांगितले, की या "रॉस सी सागरी उद्याना'मुळे सुमारे 35 वर्षे तरी व्यापारी मच्छीमारांपासून संरक्षण होईल. महासागरातील रॉस समुद्र हा पर्यावरणाच्या दृष्टीने जगातील एक महत्त्वाचा समुद्र आहे. महासागराच्या दक्षिण भागातील 12 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक भाग या उद्यानाने व्यापाला जाईल. जे पेंग्विन, व्हेल, समुद्र पक्षी, प्रचंड असे जलचर, अशा दहा हजार प्रकारच्या प्रजातींचे घर आहे, या भागात 1.1 दशलक्ष चौरस किलोमीटर परिसरात मासेमारीला पूर्ण बंदी असेल. येथील काही भाग संशोधनासाठी राखून ठेवण्यात येणार आहे. सागरी वैविध्याच्या संरक्षणासाठी जागतिक पातळीवर होत असलेल्या प्रयत्नांच्या दृष्टीने हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे मत शास्त्रज्ञ आणि या क्षेत्रातील काम करणाऱ्यांनी व्यक्त केले आहे. एकूण 25 सदस्य असलेल्या या आयोगामध्ये रशिया, चीन, अमेरिका आणि युरोपियन युनियनचा समावेश असून, या सर्वांनी "सागरी उद्याना'स पाठिंबा दर्शविला आहे.

Web Title: Sea guarden on Antarctica