Ukraine : दुसऱ्या विमानाचं उड्डाण; २५० नागरिकांसह दिल्लीत पोहोचणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Second flight from Ukraine
युक्रेनमधील भारतीयांना घेऊन दुसऱ्या विमानाचं उड्डाण; २५० नागरिकांसह दिल्लीत पोहोचणार

Ukraine : दुसऱ्या विमानाचं उड्डाण; २५० नागरिकांसह दिल्लीत पोहोचणार

नवी दिल्ली : युक्रेनमध्ये (Ukraine) अडकलेल्या २१९ भारतीयांना घेऊन पहिलं विमान मुंबईत दाखल झालं त्यानंतर आता दुसऱ्या विमानानं रोमानियाची (Romania) राजधानी बुचारेस्ट इथून दिल्लीकडं उड्डाण केलं आहे. या विमानात २५० भारतीय नागरिक आहेत. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jayshankar) यांनी ही माहिती दिली. (second flight from Bucharest has taken off for Delhi with 250 Indian nationals)

जयशंकर यांनी सांगितलं की, ऑपरेशन गंगा अंतर्गत युक्रेनमधील भारतीयांची सुटका केली जात आहे. या मोहिमेंतर्गत एअर इंडियाच्या दुसऱ्या विमानानं (AI 1940) बुचारेस्ट इथून स्थानिक प्रमाण वेळेनुसार रात्री ८.४५ वाजता दिल्लीकडे उड्डाण केलं आहे. रविवारी सकाळी ७.४५ पर्यंत हे विमान दिल्लीत पोहोचेल, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं आपल्या निवदेनात दिली आहे.

हेही वाचा: युक्रेनमध्ये अडकलेल्या २१९ भारतीयांना घेऊन पहिलं विमान मुंबईत दाखल

या विमानात २५० भारतीयांमध्ये कर्नाटकचे पाच विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर मदतीसाठी फॅसिलिटी सेंटरही उभारण्यात आलं आहे, असंही परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं आहे.

हेही वाचा: दिल्लीत खासगी कारमध्ये विनामास्क प्रवासाला परवानगी; केजरीवाल सरकारचा निर्णय

दरम्यान, एअर इंडियाचं पहिलं विमान (AI 1944) शनिवारी रात्री ७.५० मिनिटांनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झालं. रोमानियाची राजधानी बुचारेस्ट इथल्या हेन्री कोंडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या विमानानं दुपारच्या दरम्यान उड्डाण केलं होतं. या विमानातून २१९ भारतीय नागरिक भारतात परतले आहेत. यामध्ये बहुतांश विद्यार्थी आहेत. हे विमान मुंबई दाखल होताच केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी त्यांचं स्वागत केलं.

Web Title: Second Flight From Bucharest Has Taken Off For Delhi With 250 Indian Nationals

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top