याबेटावर लोक आंघोळ सुद्धा करत नाहीत, हस्तमैथुन-चुंबन यावर देखील आहे बंदी! sex is not allowed in ireland community inis beag | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Physical Relation

Global: या बेटावर लोक आंघोळ सुद्धा करत नाहीत, हस्तमैथुन-चुंबन यावर देखील आहे बंदी!

मुंबई : आयर्लंड हा जगातील सर्वात सुंदर देशांपैकी एक आहे. त्याचे बहुतेक भाग बेट आहेत, म्हणजे समुद्राच्या मध्यभागी आहेत. या बेटांवर अनेक वेगवेगळ्या जमाती राहतात, त्यांच्याही वेगवेगळ्या शैली आणि परंपरा आहेत.

येथील एका जमातीत लैंगिक संबंध हे पाप मानले जाते. येथे पुरुष आणि स्त्रिया तेव्हाच एकमेकांशी संबंध प्रस्थापित करू शकतात जेव्हा त्यांना त्यांचे कुटुंब वाढवायचे असते.

म्हणजेच इथले लोक फक्त मूल होण्यासाठी शारीरिक संबंध ठेवतात. एकदा मूल जन्माला आले की मग पुन्हा नाते जोडणे त्यांना योग्य वाटत नाही. (sex is not allowed in ireland community inis beag ) हेही वाचा - परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर

आयर्लंडच्या 'इनिस बेग' बेटावर ही जमात राहाते. येथे राहाणारे लोक शतकानुशतके आयर्लंडच्या मुख्य प्रवाहापासून वेगळे झाले आहेत. त्यामुळे त्यांची भाषा फक्त आयरिश आहे.

आजही त्यांचा उदरनिर्वाह प्रामुख्याने शेती, पशुपालन आणि समुद्रातील मासेमारी आहे. हे लोक त्यांच्या परंपरांबद्दल खूप पुराणमतवादी आहेत. त्यामुळे इनिस बेग बेटावर राहणारे लोक शारीरिक संबंधांना 'वाईट' मानतात.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की विवाहित जोडपे शारीरिक संबंध बनवतानाही पूर्णपणे नग्न होत नाहीत. येथे लोक अंतर्वस्त्र घालूनच शारीरिक संबंध बनवतात. अंतर्वस्त्र काढणे इथे योग्य मानले जात नाही.

हस्तमैथुन-चुंबन यांवर बंदी आहे

या बेटावर हस्तमैथुन, चुंबन आणि समलैंगिकता प्रतिबंधित आहे. लग्नापूर्वी रोमान्सचा विचार करता येत नाही. महिलांशी शारीरिक संबंध हे अत्याचारासारखे असतात, असे समाजातील लोकांचे मत आहे.

उघड्यावर लघवी करणे आणि शौच करणे यासाठी कठोर शिक्षा आहे. सर्व प्रकारच्या क्रियाकलापांमध्ये मुलांना लिंगाच्या आधारावर वेगळे ठेवले जाते. म्हणजेच, काही उपक्रम आहेत जे फक्त मुलेच करू शकतात. मुलींना तसे करण्याची परवानगी नाही. आणि अनेक उपक्रम फक्त मुलीच करू शकतात.

नग्न दिसू नये म्हणून आंघोळ करत नाहीत

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की लोक आंघोळ करत नाहीत कारण त्यांना नग्न दिसायचे नसते. फक्त हात, पाय आणि चेहरा पाण्याने धुतला जातो. नियम समाजातील लोक स्वतः ठरवतात आणि प्रत्येकजण त्याचे पालन करतो.

लग्नापूर्वी शारिरीक संबंध निषिद्ध आहेत, परंतु पती-पत्नीमध्ये जेव्हा जेव्हा लैंगिक संबंध असतात तेव्हा पती नेहमीच पुढाकार घेतो. स्त्रिया सहसा निष्क्रिय असतात. कोणत्याही प्रकारचा प्रणय नाही, संभोगानंतर पती दुसऱ्या ठिकाणी झोपायला जातो.

पीरियड्स हा तिथल्या महिलांसाठी एखाद्या आघातासारखा असतो. या काळात त्या घराबाहेर पडत नाही आणि बेडवर पडून राहातात. पुरुषांचा असा विश्वास आहे की महिला अधिक शारीरिक संबंध बनवून कमकुवत होतील. असे असूनही एकही कुटुंब असे नाही की ज्याला मुले नाहीत.

… तरीही लोक खूप रोमँटिक असतात

अमेरिकन शास्त्रज्ञ जॉन कोवान मेसेंजरने या लोकांमध्ये काही महिने घालवले. त्यांनी 'इनिस बेग: आयल ऑफ आयर्लंड' यासह अनेक पुस्तके लिहिली ज्याने जगाला या आदिवासी समाजाची अचूक माहिती दिली.

त्याने फक्त इनिस बेग हा शब्द वापरला, नाहीतर या बेटाचे नाव कोणालाच माहीत नव्हते. त्याची ओळख इनिशीर अशी ग्रंथात सांगितली आहे. तेव्हा इथली लोकसंख्या जेमतेम ३५० च्या आसपास होती.

जॉन कोवन मेसेंजरने सांगितले की, येथील लोक खूप रोमँटिक आहेत. पण सांस्कृतिक अस्मितेबाबत अतिशय ठाम आणि कडक. एक खास प्रकारचा पारंपरिक पेहराव असतो. महिला असो वा पुरुष, प्रत्येकजण डोंगी चालवण्यात निपुण आहे.

टॅग्स :IrelandRelationship Tips