तुरुंगात परतण्यापूर्वी शरीफ यांचे शक्तिप्रदर्शन

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 मे 2019

सहा आठवड्यांसाठी मंजूर करण्यात आलेल्या जामिनाचा कालावधी संपल्यानंतर तुरुंगात परतण्यापूर्वी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

लाहोर : सहा आठवड्यांसाठी मंजूर करण्यात आलेल्या जामिनाचा कालावधी संपल्यानंतर तुरुंगात परतण्यापूर्वी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

शरीफ यांचे निवासस्थान ते कोट लखपत तुरुंर, अशी मोठी रॉली काढण्यात आली होती. त्यात शरीफ यांचे हजारो समर्थक सहभागी झाले होते. अल अझिझिया मिल्स भ्रष्टाचारप्रकरणी शरीफ यांना सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे.

आजारी असलेल्या शरफी यांना सर्वोच्च न्यायालयाने 26 मार्च रोजी सहा आठवड्यांसाठी जामीन मंजूर केला होता. त्याची आज मुदत संपली. विदेशात उपचारांसाठी जाण्यास परवानगी देण्याची शरीफ यांची विनंतीही न्यायालयाने फेटाळून लावली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharif power showing before returning to prison