राहिल शरीफ 29 ला निवृत्त

पीटीआय
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

लाहोर - कार्यकाल संपण्याबाबतचा संभ्रम दूर करत पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल राहिल शरीफ यांनी लष्कराच्या सर्व केंद्रांना अखेरची भेट देण्यास आजपासून सुरवात केली. जनरल शरीफ हे 29 नोव्हेंबरला निवृत्त होत असून त्यांचा कार्यकाल वाढविला जाण्याबाबत चर्चा होती. शरीफ यांनी आज लाहोर येथील लष्करी केंद्राला भेट दिली आणि सैनिकांशी संवाद साधला. या महिन्याच्या अखेरपर्यंत नव्या लष्करप्रमुखांचे नाव निश्‍चित होऊन त्यांच्याकडे सूत्रे सोपविली जातील. वरिष्ठतेच्या क्रमानुसार लेफ्टनंट जनरल झुबेर हयात यांचा सर्वांत वरचा क्रमांक आहे.

लाहोर - कार्यकाल संपण्याबाबतचा संभ्रम दूर करत पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल राहिल शरीफ यांनी लष्कराच्या सर्व केंद्रांना अखेरची भेट देण्यास आजपासून सुरवात केली. जनरल शरीफ हे 29 नोव्हेंबरला निवृत्त होत असून त्यांचा कार्यकाल वाढविला जाण्याबाबत चर्चा होती. शरीफ यांनी आज लाहोर येथील लष्करी केंद्राला भेट दिली आणि सैनिकांशी संवाद साधला. या महिन्याच्या अखेरपर्यंत नव्या लष्करप्रमुखांचे नाव निश्‍चित होऊन त्यांच्याकडे सूत्रे सोपविली जातील. वरिष्ठतेच्या क्रमानुसार लेफ्टनंट जनरल झुबेर हयात यांचा सर्वांत वरचा क्रमांक आहे. त्यानंतर लेफ्टनंट जनरल इश्‍फाक नदीम अहमद, लेफ्टनंट जनरल जावेद इक्‍बाल रामदे आणि लेफ्टनंट जनरल जावेद बाज्वा असे चार पर्याय पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासमोर आहेत. यातील बाज्वा आणि नदीम यांना अधिक संधी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Sharif will be 29 to retire