माझ्या अंतराळयात्रेचे वृत्त चुकीचे : शावना पंड्या

पीटीआय
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

टोरांटो - कॅनडामधील शावना पंड्या (वय 32) हिची सिटिझन सायन्स ऍस्ट्रोनॉट कार्यक्रमाअंतर्गत अवकाशमोहिमेमध्ये निवड झाल्याचे वृत्त चुकीचे असल्याचा खुलासा शावनाने फेसबुक पोस्टद्वारे केला आहे.

टोरांटो - कॅनडामधील शावना पंड्या (वय 32) हिची सिटिझन सायन्स ऍस्ट्रोनॉट कार्यक्रमाअंतर्गत अवकाशमोहिमेमध्ये निवड झाल्याचे वृत्त चुकीचे असल्याचा खुलासा शावनाने फेसबुक पोस्टद्वारे केला आहे.

गुरुवारपासून शावना पंड्याची अवकाशमोहिमेसाठी निवड झाल्याचे वृत्त पसरले होते. या पार्श्‍वभूमीवर तिने फेसबुक पोस्टद्वारे खुलासा केला आहे. तिने म्हटले आहे की, "तुम्हा साऱ्यांच्या शुभेच्छांबद्दल आभार. गेल्या 24 तासांत माध्यमांमध्ये वृत्त पसरले आहे. त्यामध्ये काही चुकीची माहिती देण्यात आली आहे. त्याबाबत मला खुलासा करावासा वाटतो. सिटिझन सायन्स ऍस्ट्रोनॉट कार्यक्रमासंदर्भात कोणतीही नवी घोषणा झालेली नाही. या कार्यक्रमात 24 तासांपूर्वी मी सहभागी होण्याची शक्‍यता होती. मात्र आता या कार्यक्रमात इतर सदस्यांपेक्षा माझा सहभाग होण्याची शक्‍यता खूप कमी आहे. कॅनडातील अवकाश संस्थेपक्षा माझे काम वेगळे आहे. मी त्यांचे प्रतिनिधीत्व करत नाही. कॅनडातील अवकाश संस्थेतील अवकाशयात्रींच्या निवडीची प्रक्रिया सुरू असून या वर्षी अंतिम होईल. मी या निवडप्रक्रियेत सहभागी नाही. मी सध्या इतर कोणत्याही संस्थेशी संलग्न नाही.' असा खुलासा करत "माझ्यासंदर्भात जी काही माहिती देण्यात येत आहे, ती चुकून देण्यात येत आहे', असे शावनाने स्पष्ट केले आहे.

"काही लेखांमध्ये मी न्यूरोसर्जन असल्याचे चुकून म्हटले आहे. मी यापूर्वी फार कमी काळ न्यूरोसर्जनचे प्रशिक्षण घेतले होते. मात्र, माझ्याकडे जनरल प्रॅक्‍टिसचा परवाना आहे', असा खुलासाही तिने केला आहे.

Web Title: Shawna Pandya from Canada to become the third Indian-origin woman to fly to space