PM Shekh Hasina: भारत आमचा 'टेस्टेड फ्रेंड' बांग्लादेशच्या पीएमकडून कौतूक की टोमणा? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Shekh Hasina: भारत आमचा 'टेस्टेड फ्रेंड' बांग्लादेशच्या पीएमकडून कौतूक की टोमणा?

PM Shekh Hasina: भारत आमचा 'टेस्टेड फ्रेंड' बांग्लादेशच्या पीएमकडून कौतूक की टोमणा?

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना 5 सप्टेंबरला भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान अनेक गंभीर मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. तत्पूर्वी शेख हसीना यांनी एजन्सीला मुलाखत दिली. मुलाखतीत त्यांनी भारताला बांगलादेशचा 'टेस्टेड फ्रेंड' (परीक्षित मित्र) म्हणून वर्णन केले आहे, त्याचवेळी कठीण काळात मदत केल्याबद्दलही पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे.

शेख हसीना म्हणाल्या की, रशिया-युक्रेन युद्धात आमचे अनेक विद्यार्थी पूर्व युरोपमध्ये अडकले होते, ज्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने भारताने वाचवले. त्यांनी आपल्या देशातील विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराचे कौतुक केले. यादरम्यान शेख हसीना यांनी लस मैत्री कार्यक्रमांतर्गत शेजारी देशांना कोविड-19 लस देण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचेही कौतुक केले.

हेही वाचा: बांगलादेशावर रोहिंग्यांचं मोठं ओझं, भारत बजावू शकतो मोठी भूमिका : PM शेख हसीना

रोहिंग्यांनी मायदेशी परतावं : शेख हसीना

आमच्या सरकारनं मानवतावादी पैलू लक्षात घेऊन विस्थापित समुदायाची काळजी घेण्याचा प्रयत्न केलाय. मानवतावादी आधारावर आम्ही त्यांना आश्रय देत आहोत आणि सर्व काही पुरवत आहोत. परंतु, या कोविड दरम्यान आम्ही सर्व रोहिंग्या समुदायाचं लसीकरण केलं. पण, ते इथं किती दिवस राहणार? त्यामुळं ते छावणीतच आहेत. काही लोक अमली पदार्थांची तस्करी, महिलांची तस्करी करताहेत. त्यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळं ते जितक्या लवकर मायदेशी परततील, ते आपल्या देशासाठी आणि म्यानमारसाठीही (Myanmar) चांगलं आहे, असंही हसीनांनी सांगितलं. आम्ही रोहिंग्यांसाठी आंतरराष्ट्रीय समुदाय आणि आसियान किंवा संयुक्त राष्ट्रांसारख्या इतर देशांशीही चर्चा करत आहोत, असं हसीना म्हणाल्या.

Web Title: Sheikh Hasina Calls India Tested Friend Lauds Pm Modi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..