न्यूयॉर्कमध्येही शिवजयंती थाटात साजरी

newyork
newyork

न्यूयॉर्क: न्यूयॉर्कमध्ये शिवाजी महाराज जयंती 18 फेब्रुवारीला शहरातील भारतीय दूतावासात प्रचंड उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती फाऊंडेशनतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जयंती साजरी करण्याचे यंदाचे सातवे वर्ष होते.  

यावर्षी भारत सरकारचे  वाणिज्य दूतावास आणि अल्बानी ढोल ताशा ग्रुप यांच्या संयुकत विद्यमाने कलाकारांनी शिवजन्म, शिवराज्यभिषेक असे  प्रयोग सादर केले आणि सांस्कृतिक संगीत / नृत्य, लेझीम, पोवाडा असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यात आले. 

या कार्यक्रमाला दिग्दर्शक नागराज मंजुळे, न्यूयॉर्क स्टेट सिनेटर केव्हिन थॉमस, पश्चिम विंडसर भागाचे महापौर हेमंत मराठे, उप-राजदूत शत्रुघ्न सिन्हा उपस्थित होेते. 

'शिवाजी महाराजांच्या प्रतिमा धार्मिक आणि समाजविरोधी उद्देशांसाठी विपरीत पद्धतीने मांडली व आपण स्वतः लहानपणी त्यावर विश्वास ठेवत असू. प्रत्येकाने खरं शिवचरित्राचा अभ्यास करावा - गोविंद पानसरे आणि डॉ. आ. ह. साळुंखे यांचे वाचनआतून खरे शिवाजी समजून घेणे महत्वाचे आहे, असे मत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले. 

न्यूयॉर्क स्टेट सिनेटर केव्हिन थॉमस यांनी युवकांमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी छत्रपती फाऊंडेशनला त्यांनी एक गौरव-प्रमाणपत्र दिले.

शिवाजी महाराजांनी भारतीयांच्या पिढ्यांना प्रेरणा दिली, असे मत पश्चिम विंडसरचे महापौर हेमंत मराठे यांनी व्यक्त केले. तर शिवाजी महाराज महान योद्धा आणि भारतीय आरमाराचे जनक आहेत असे उद्गार उप-राजदूत शत्रुघ्न सिन्हा यांनी काढले. 

न्यूयॉर्क, न्यू जर्सी, कनेक्टिकट, पेनसिल्व्हेनिया आणि मॅसॅच्युसेट्स या सभोवतालच्या राज्यातून आलेल्या शिवभक्तांनी हॉल भरगच्च भरला होता .
छत्रपती फाऊंडेशनने त्याच वेळी डलास (टेक्सास), डेट्रोइट (मिशिगन) येथेही शिवजयंती आयोजित केली.

छत्रपती फाऊंडेशन
छत्रपती फाऊंडेशन एक तरुण आणि विद्यार्थी संस्था आहे जी आंतरराष्ट्रीय स्तरावर शिवाजी महाराजांच्या लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष विचारांचा प्रचारास समर्पित आहे. पुढील वर्षी न्यू यॉर्क शहरात युनायटेड नेशन्स मुख्यालयात शिवजयंती आयोजित करण्याची योजना छत्रपती फाउंडेशन काम करत आहे. जिजाऊ  जयंती, आंबेडकर जयंती, शाहू जयंती, अहिल्याबाई होळकर जयंती, सावित्रीबाई फुले जयंती इत्यादींसह इंडिया डे परेड यासारखे उपक्रम वर्षभर राबविले जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com