पुतीन यांना धक्का! टॉप सिक्रेट मिशनवर असलेला रशियन गुप्तहेर युक्रेनमध्ये ठार

Russia Ukraine War: युक्रेनमध्ये एका टॉप सिक्रेट मिशनवर असणारा रशियन गुप्तहेर ठार झाला आहे.
Russian Spy Killed in Ukraine
Russian Spy Killed in Ukraine Sakal

Russia Ukraine War: रशिया युक्रेन युद्ध सुरु होऊन आता 21 दिवस झाले. या काळात दोन्ही देशांचं प्रचंड नुकसान झालं आहे. रशियाने युक्रेनवर हल्ले करून कीव्ह, खार्कीव्ह या शहरांचं रुपडंच बदलून टाकलं. नुकत्याच झालेल्या चौथ्या टप्प्यातील चर्चा सकारात्मक झाल्यामुळे येत्या काळात युद्ध थांबू शकते. परंतु अजूनही त्याची खात्री नाही.

रशियाच्या हल्ल्यामध्ये युक्रेनच्या सैनिकांबरोबरच हजारो नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. युक्रेननंही रशियाचा तीव्र प्रतिकार करत हजारो रशियन सैन्याना ठार केलं आहे. या युद्धात रशियाच्या 12 कमांडरना जीव गमवावा लागला आहे. विशेष म्हणजे या 12 जणांमध्ये युक्रेनमध्ये एका सिक्रेट मिशनवर असणाऱ्या एका रशियन गुप्तहेराचाही मृत्यू झाल्याचं वृत्त ठार झाला आहे. कॅप्टन एलेक्सी ग्लुशचक (Alexey Glushchak) असे या रशियन गुप्तहेराचं नाव असून त्याच्या मृत्यूमुळे पुतीन (Vladimir Putin) यांना मोठा धक्का बसल्याचं मानले जात आहे. (Shock Putin! Russian spy Alexey Glushchak on top secret mission killed in Ukraine)

Russian Spy Killed in Ukraine
Russia Ukraine War: रशियावर उत्तर कोरियापेक्षाही अधिक निर्बंध, 70 वर्षांचा विक्रम मोडला

31 वर्षीय रशियन गुप्तहेर कॅप्टन एलेक्सी ग्लुशचक हा सायबेरियाच्या ट्युमेनचा रहिवासी होता. जीआरयू मिलिट्री इंटेलिजेंस स्पायमध्ये तो कार्यरत होता. मारियुपोलोमध्ये सुरु असले्ल्या युद्धात ग्लुशचक मारला गेला असल्याचं वृत्त 'द सन'ने दिलं आहे. रशियाने ग्लुशचकवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले आहेत. ग्लुशचक युक्रेनमध्ये कोणत्या सिक्रेट मिशनवर होता, हे मात्र रशियाने गुप्त ठेवले आहे.

Russian Spy Killed in Ukraine
Russia Ukraine War: युक्रेनमधून पाळीव प्राण्यांसह भारतात येण्यासाठी सरकारचे नियम शिथिल

8 मार्च रोजी त्याने आपल्या कुटूंबाशी फोनवरून संवाद साधला होता. त्याच दिवशी सायंकाळी तो ठार झाला. त्याला नक्की युक्रेनच्या सैनिकांनी मारले की आपल्याच सैन्याच्या हल्ल्यात तो ठार झाला, हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com