शीख चालकास अमेरिकेत धक्काबुक्की

वृत्तसंस्था
बुधवार, 19 एप्रिल 2017

न्यूयॉर्क: अमेरिकेत टॅक्‍सीचालक म्हणून काम करणाऱ्या शीख समुदायातील एका व्यक्तीस मद्यपी तरुणांनी धक्काबुक्की केल्याची घटना रविवारी घडली.

मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथून तीन तरुण व एका तरुणीने हरकिरतसिंग यांची टॅक्‍सी भाड्याने घेतली. त्यांना ब्रोनेक्‍स येथे जायचे होते. नियोजित स्थळी पोचल्यानंतर त्यांनी हरकिरत यांच्याबरोबर हुज्जत घालण्यास सुरवात केली. चुकीच्या ठिकाणी आणल्याचा आरोप करत त्यांनी हरकिरत यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. तसेच, टॅक्‍सीचे नुकसान करण्याचाही प्रयत्न केला. पोलिसांना पाचारण केल्यानंतर संबंधित तरुणांनी हरकिरत यांची पगडी घेऊन तेथून पळ काढला.

दरम्यान, हा प्रकार चुकीचा असून, आपले अमेरिकेत स्वागतच आहे. तुम्ही पोलिसांना बोलावून चांगले काम केले, असे ट्विट मेअर बिल डे ब्लासियो यांनी करत हरकिरत यांना पाठिंबा व्यक्त केला. पोलिसांनी याबाबतचा तपास सुरू केला आहे.

या प्रकाराने आपण भयभीत झालो असून, यामुळे माझा धर्म व आस्था यांचा अपमान झाला आहे. आता येथे काम करण्याची इच्छा राहिली नाही.
- हरकिरतसिंग, टॅक्‍सीचालक

Web Title: Sikh driver blogger in us