कॅनडा: शीख व्यक्तीला पगडी काढण्याची धमकी

पीटीआय
रविवार, 21 जानेवारी 2018

जसविंदरसिंग धालीवाल यांच्या बाबतीत नुकताच हा प्रकार घडला. ते येथील रॉयल कॅनेडियन लिजन या माजी सैनिकांच्या क्‍लबमध्ये गेले असताना क्‍लबच्या नियमानुसार माजी सैनिकांना आदर म्हणून डोक्‍यावर काहीही घालण्यास मनाई आहे. मात्र, धार्मिक वस्त्रांबाबतीत ही बंदी शिथील आहे

ओटावा - कॅनडामधील एका क्‍लबमध्ये शीख व्यक्तीला पगडी काढण्यास सांगण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित क्‍लबच्या महिला अधिकाऱ्यांनी पगडी खेचून काढण्याची धमकीही दिली होती.

जसविंदरसिंग धालीवाल यांच्या बाबतीत नुकताच हा प्रकार घडला. ते येथील रॉयल कॅनेडियन लिजन या माजी सैनिकांच्या क्‍लबमध्ये गेले असताना क्‍लबच्या नियमानुसार माजी सैनिकांना आदर म्हणून डोक्‍यावर काहीही घालण्यास मनाई आहे. मात्र, धार्मिक वस्त्रांबाबतीत ही बंदी शिथील आहे. तरीही धालीवाल यांना क्‍लबकडून मानहानीकारक वागणूक देण्यात आली. क्‍लबच्या मालकांनी माफी मागण्याची तयारी दर्शविली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sikh man asked to remove turban in Canada

टॅग्स