बाल अश्‍लील साहित्यप्रकरणी सहा जणांना अटक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

टोकियो : लहान मुलांचे अश्‍लील साहित्य (व्हिडिओज) बनविणाऱ्या सहा जणांना जपानच्या पोलिसांनी अटक केली. या सर्वांनी सुमारे 168 मुलांचे शोषण केल्याचेही जपानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. जपानमध्ये 2020 मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक सामन्यांच्या पार्श्‍वभूमीवर सध्या जपान स्वत:ची प्रतिमा चांगली करण्याच्या प्रयत्नात असून, गैर उद्योगांना आळा घालण्यासाठीच ही कारवाई झाल्याचे बोलले जात आहे.

जपानमध्ये लहान मुलांचे लैंगिक शोषण होत असून, येथे लहान मुलांचे अश्‍लील साहित्य जवळ बाळगण्यास बंदी घालण्यासाठी कायदा करण्यात आला आहे. आज केलेल्या कारवाईबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चार ते 13 वर्षांतील मुलांच्या एक लाखाहून अधिक व्हिडिओ फाइल्स ताब्यात घेण्यात आल्या असून, या सर्व आरोपींच्या संगणकात सापडल्या आहेत. हे सर्व आरोपी 20 ते 66 वयातील असून, यातील काही जण शाळांमध्ये शिक्षक म्हणूनही कार्यरत आहेत. पोलिसांना तपास लागू नये म्हणून ही मंडळी फोटोज आणि व्हिडिओज इंटरनेटऐवजी अन्य ऍप्लिकेशनद्वारेच हस्तांतरित करत असल्याचीही माहिती या वेळी पोलिसांनी दिली आहे. जपानमध्ये गेल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यांत अशा प्रकारचे 384 गुन्हे समोर आले होते, तर यंदा ही संख्या आत्ताच 781 वर पोचली आहे.

Web Title: six arrested in tokiyo