America Firing : अमेरिकेतील गोळीबारात सहा जणांचा मृत्यू

नॅशव्हिलेमधील खासगी ख्रिश्‍चन कॉन्व्हेंट शाळेत एका महिलेने बेछूट गोळीबार केला. यामध्ये सहाजणांचा मृत्यू झाला.
gun firing
gun firingsakal
Summary

नॅशव्हिलेमधील खासगी ख्रिश्‍चन कॉन्व्हेंट शाळेत एका महिलेने बेछूट गोळीबार केला. यामध्ये सहाजणांचा मृत्यू झाला.

नॅशव्हिले (अमेरिका) - नॅशव्हिलेमधील खासगी ख्रिश्‍चन कॉन्व्हेंट शाळेत एका महिलेने सोमवारी (ता.२७) बेछूट गोळीबार केला. यामध्ये सहाजणांचा मृत्यू झाला. त्यात नऊ वर्षांची तीन मुले आणि शाळेतील तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

या गोळीबाराचे सीसीटिव्ही चित्रण शाळेने प्रसिद्ध केले आहे. हल्लेखोर महिला शाळेत प्रवेश करताना आणि नंतर पळापळ झालेली त्यात दिसत आहे. संशयित महिलेला पोलिसांनी ठार केले असून ती या शाळेची माजी विद्यार्थिनी होती, असे सांगितले जात आहे. शाळेतील या हल्ल्यातील मृतांबद्दल दुःख व्यक्त करीत हा गोळीबार म्हणजे ‘कुटुंबातील सर्वांत वाईट स्वप्न’ असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन म्हणाले. या घटनेनंतर काही अर्ध-स्वयंचलित शस्त्रांवर बंदी घालण्यासाठी आवाहन त्यांनी अमेरिकी प्रतिनिधिगृहाला केली. ‘या घटनेने देशाच्या आत्म्याला ठेच पोहचली आहे, असेही ते म्हणाले.

हल्लेखोर महिला असल्याने आश्‍चर्य

अमेरिकेत सामूहिक गोळीबाराच्‍या घटना नव्या नाहीत. पण हल्लेखोर एक महिला असल्याने तज्ज्ञांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे. आतापर्यंत घडलेल्या अशा घटनांमध्ये महिला हल्लेखोरांचे प्रमाण पाच ते आठ टक्के आहे, असे अलाबामा विद्यापीठातील फौजदारी कायद्याचे प्राध्यापक ॲडम लँकफोर्ड यांनी सांगितले.

सामूहिक गोळीबाराचा गेल्या दहा वर्षांपासून अभ्यास करणारे व्हँडरबिल्ट विद्यापीठातील समाजशास्त्र आणि मानसोपचाराचे प्राध्यापक जोनाथन मेटझल म्हणाले, की संशोधकांच्या मते महिलांपेक्षा पुरुष जास्त गोळीबार का करतात, याची तीन कारणे आहेत. पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरोन (लैंगिक हार्मोन) जास्त असते, हिंसाचार करण्यासाठी त्यांना प्रवृत्त केले जाते आणि महिलांपेक्षा पुरुष अधिक शस्त्रे बाळगतात, ही तीन कारणे यामागे असल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com