सहा भारतीयांना अमेरिकेत अटक 

पीटीआय
रविवार, 2 सप्टेंबर 2018

न्यूयॉर्क (पीटीआय) : गुन्हेगारी कारवाया आणि स्थलांतर कायद्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अमेरिकेतील सहा राज्यांत तीनशेहून अधिक विदेशी नागरिकांना महिनाभरात अटक करण्यात आली आहे. यात सहा भारतीयांचा समावेश आहे. 

न्यूयॉर्क (पीटीआय) : गुन्हेगारी कारवाया आणि स्थलांतर कायद्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अमेरिकेतील सहा राज्यांत तीनशेहून अधिक विदेशी नागरिकांना महिनाभरात अटक करण्यात आली आहे. यात सहा भारतीयांचा समावेश आहे. 

अमेरिकेच्या स्थलांतर व सीमा शुल्क विभागाने गुन्हेगारी कारवाया आणि स्थलांतर कायद्यांचे भंग करणाऱ्या नागरिकांविरुद्ध 30 दिवस मोहीम राबविली. अमेरिकेतील इंडियाना, इलिनॉइस, कान्सास, केंटुकी, मिसौरी आणि विस्कॉन्सिन या सहा राज्यांत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत 364 जणांना अटक करण्यात आली. याध्ये 25 देशांतील नागरिकांचा समावेश आहे. यात मेक्‍सिकोतील तब्बल 236 नागरिक आहेत. तसेच, कोलंबिया, झेक प्रजासत्ताक, इक्वेडोर, जर्मनी, ग्वाटेमाला. होंडुरास, मेक्‍सिको, सौदी अरेबिया आणि युक्रेनसह इतर देशांतीन नागरिकांचा समावेश आहे. 

या कारवाईत एकूण 364 जणांना अटक करण्यात आली असून, यात 187 जणांना गुन्हेगारी प्रकरणांमध्ये शिक्षा झालेले आहेत. यामध्ये 346 पुरुष अणि 16 महिला आहेत. यातील अनेक जण हल्ला, खुनाचा प्रयत्न, चोरी, मुलांचे लैंगिक शोषण, कौटुंबिक हिंसाचार, अमली पदार्थांची तस्करी, देशात पुन्हा बेकायदा प्रवेश आदी गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेले आहेत. 
 
एकूण अटक : 365 
मेक्‍सिकोचे नागरिक : 263 
भारतीय नागरिक : 6 

कारवाई का? 
- गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभाग 
- स्थलांतर कायद्यांचे उल्लंघन 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six Indians arrested in US