स्मार्टफोनमुळे मुलांच्या लठ्ठपणात वाढ

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

मॅसेच्युसेट्स - लठ्ठपणा ही आजच्या जिवनपद्धतीमधील एक मुख्य समस्या बनली आहे. प्रत्येक तिसरा व्यक्ती लठ्ठपणाला सामोरे जातोय. वयात येणाऱ्या मुलांना देखील या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. स्मार्टफोनच्या अती वापरामुळे देखील किशोरवयीन मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढत असल्याचे एका सर्वेक्षणात समोर आहे.

'हार्वर्ड टी एच चॅन स्कूल' यांच्या सार्वजनिक आरोग्याचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोरवयीन मुले दिवसातील 5 ते 6 तास हे फक्त स्मार्टफोनच्या समोर घालवतात त्यातील 43 टक्के मुलांना लठ्ठपणाच्या समस्येला सामोरे जावे लागते. 

स्मार्टफोन बरोबरच टिव्ही बघण्याचा वाढलेला वेळ हे देखील लठ्ठपणा वाढण्यासाठी कारणीभूत आहे. त्यचप्रमाणे सारखे बसून राहण्याने मुलांच्या पचनस्थेवर देखील परिणाम होत असल्याचे या सर्वेक्षणात समोर आले आहे.

मुलांमधील ही समस्या कमी करायची असेल तर मुलांना यासाठी दिवसातला काही वेळच टिव्ही किंवा स्मार्टफोन बघण्यासाठी ठरवून देण्याची आवश्यकता असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. 

Web Title: Smartphone addiction may up obesity risk in teens