विमानात साप निघाल्याने प्रवाशांची घबराट

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

लिऑ- विमान हवेत असताना अचानक साप दिसल्यास प्रवाशांची काय अवस्था होईल? याचा विचार केला तरी अंगावर काटा उभा राहील. एरो मेक्सिकोच्या विमानामध्ये हा अऩुभव प्रवाशांना आला अन् विमानाचे तत्काळ लॅंण्डिंग करण्यात आले. विमानातील सापाचा व्हिडिओ सोशल नेटवकिंगवर मोठ्या प्रमाणात व्हॉयरल होताना दिसत आहे.

तोरेऑनहून रविवारी (ता. 6) विमान मॅक्सीको-सिटीकडे निघाले होते. विमान हवेत असताना खिडकीच्या वरच्या बाजूला प्रवाशांना अचानक साप दिसला अन् प्रवाशांची घबराट उडाली. प्रवाशांनी याबाबतची माहिती वैमानिकांना दिली. यामुळे विमान जवळच्या विमानतळावर उतरविण्यात आले. प्राणिमित्राला बोलावून सापाला पकडण्यात आले.

दरम्यान, विमानात साप आलाच कसा याबाबतची चौकशी सुरु करण्यात आली आहे. यापुढे अशा घटना टाळण्यासाठी खबदारी घेऊ, असे एरो मेक्सिकोने म्हटले आहे.

Web Title: Snake on plane scares passengers