सहारा वाळवंटात बर्फवृष्टी

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 जानेवारी 2018

ग्लोबल वॉर्मिंग किंवा जागतिक तामपानवाढीचे दृश्य परिणाम आता दिसू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचे बदल जाणवत आहेत. बॉम्ब चक्रीवादळामुळे अमेरिकेत कडाक्याची थंडी पडली आहे. तर सिडनीमध्ये तापमानाने उच्चांक गाठला असून रविवारी तिथले तापमान 45 अंश सेल्शियसच्या आसपास पोहोचले.  जगभरात हवामानात बदल बघायला मिळत असून, सहारा वाळवंटात देखील बर्फवृष्टी झाली आहे. 

गेल्या चाळीस वर्षांत सहारामध्ये तिसऱ्यांदा बर्फवृष्टी झाली. एरव्ही असह्य उष्णता आणि दूरदूरपर्यंत पसरलेल्या वाळूच्या डोंगराला बर्फवृष्टीमुळे एक वेगळेच रुप प्राप्त झाले आहे. 

अल्जेरियामधल्या एन सेफ्रा भागात ही बर्फवृष्टी झाली. सहारा वाळवंटाचाच हा भाग आहे. एरव्ही इथले तापमान 35 अंश सेल्शिअस असते परंतु, सध्या हे तापमान 1 अंश सेल्शिअसच्या आसपास आहे. 

गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात देखील इथे अशाप्रकारची बर्फवृष्टी झाली होती.

Web Title: Snow in the Sahara Creates White-Capped Dunes of Eerie Beauty