
मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यातील दोषी आणि मूळचा पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन उद्योगपती तहव्वूर राणा याच्या भारतातील प्रत्यार्पणात असंख्य अडथळे येत आहेत. अमेरिकेतील वकिलांनी त्याची जमिनावर सुटका करण्यास विरोध दर्शविला आहे.
वॉशिंग्टन - मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यातील दोषी आणि मूळचा पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन उद्योगपती तहव्वूर राणा याच्या भारतातील प्रत्यार्पणात असंख्य अडथळे येत आहेत. अमेरिकेतील वकिलांनी त्याची जमिनावर सुटका करण्यास विरोध दर्शविला आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
राणाला कॅनडात जाण्याची परवानगी दिल्यास त्याची भारतात होणाऱ्या मृत्यूदंडाच्या शिक्षेपासून सुटका होऊ शकते, अशी भीती अमेरिकेला वाटत आहे. राणाला जामीन दिल्यानंतरदेखील तो न्यायालयात हजर होईल याची खात्री देता येत नाही. यामुळे तो हातून निसटू शकतो. तसे झाल्यास अमेरिका- भारत संबंधात तणाव निर्माण होईल, अशी भीती अमेरिकेचे ॲटर्नी जॉन. जे. लुलीजियान यांनी लॉस अँजेलिसमधील फेडरल कोर्टात व्यक्त केली.
अमेरिकेनंतर ब्राझील बनतोय कोरोनाचा हॉटस्पॉट; मृतांची संख्या झाली एवढी
मागील आठवड्यातच या प्रकरणी सुनावणी झाल्याचे समजते. राणाला कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्याची तुरुंगातून सुटका करण्यात आली होती. भारताने त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केल्यानंतर त्याला पुन्हा लॉस एंजेलिसमध्ये अटक करण्यात आली होती. अमेरिकेच्या डिस्ट्रिक्ट कोर्टात ३० जून रोजी या प्रकरणी सुनावणी अपेक्षित आहे.