Video: उडत्या विमानातून सैनिक कोसळला; काळजाचा ठोका चुकवणारा व्हीडिओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

plane accident video

Video: उडत्या विमानातून सैनिक कोसळला; काळजाचा ठोका चुकवणारा व्हीडिओ

नवी दिल्लीः चक्क उडत्या विमानातून एक सैनिक कोसळल्याची घटना घडली आहे. हृदयाचा ठोका चुकणारा हा व्हीडिओ समोर आलेला आहे. मात्र त्यानंतर एक चमत्कारिक घटना घडली.

ट्रेनिंग सुरु असतांना एका सैनिकाने हरक्युलिस सी-१३० या विमानामधून उडी घेतली. मात्र त्याचं पॅराशूट उघडलंच नाही. त्यामुळे तो सैनिक १६०० फुटांवरुन जमिनीवर कोसळला. हा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

हेही वाचाः Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

या घटनेमध्ये सदरील सैनिक जखमी झाला आहे. सुदैवाने त्याचा जीव वाचला. इंडोनेशियामध्ये घडलेल्या या घटनेने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.

डेली मेलच्या वृत्तानुसार सैनिक सलमान क्रिसनेस इंडोनेशियातल्या ऑरेज बॅरेट्सचे सदस्य आहेत. सलमान ८ नोव्हेंबर रोजी इंडोनेशियाची राजधानी जकार्ताच्या पूर्व भागात सुलेमान एअरबेस येथे ट्रेनिंग एक्सरसाईजमध्ये सहभागी झाले होते. तेव्हाच ही दुर्घटना घडली. सुदैवाने यामध्ये सैनिकाचा जीव वाचला आहे.

टॅग्स :Indonesiaplanesoldiers