दक्षिण कोरियाला बसला भूकंपाचा धक्का

दक्षिण कोरियाला बसला भूकंपाचा धक्का

सोल : दक्षिण कोरियाला आज भूकंपाचा धक्का बसला. रिश्‍टर स्केलवर त्याची तीव्रता 5.4 इतकी नोंदली गेली. देशातील हा दुसरा मोठा भूकंप असल्याची नोंद करण्यात आली असून अशा प्रकारचा धक्का हा कधीतरीच या दक्षिण कोरियाला बसला आहे.

राजधानी सोलसह संपूर्ण देशाला हा भूकंपाचा धक्का जाणवला. औद्योगिक शहर पोहनपासून नऊ किलोमीटरवर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. दुपारी अडीचच्या सुमारास हा धक्का जाणवल्याची माहिती कोरियाच्या हवामान खात्याच्या प्रशासनाने दिली. यामध्ये सात जण जखमी झाल्याची माहिती सोलचे प्रशासन मंत्र्यांनी दिली. मात्र भूकंप तीव्र स्वरूपाचा असल्याने आकडा आणखी वाढू शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. कोरियन द्वीपकल्पात कधीतरीच भूकंपाचे धक्के जाणवतात. या भूकंपाच्या स्थितीवर बारकाईने लक्ष्य देण्यात येत आहे. कारण उत्तर कोरियाने नुकत्याच आण्विक चाचण्या केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com