उत्तर कोरियाकडून पुन्हा आगळीक; पुन्हा जपानवरून सोडले क्षेपणास्त्र

वृत्तसंस्था
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

सोल: संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) सुरक्षा परिषदेने नव्याने घातलेल्या कठोर निर्बंधांना प्रत्युत्तर म्हणून उत्तर कोरियाने आज पुन्हा एकदा क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. उत्तर कोरियाने डागलेले मध्यम पल्ल्याचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र (आयआरबीएम) जपानवरून जात प्रशांत महासागरात कोसळले. अमेरिकेतील ग्वाम बेटांवर हल्ले करण्याची क्षमता उत्तर कोरियाकडे असल्याचे आजच्या क्षेपणास्त्र चाचणीने दाखवून दिले असल्याचा दावा विश्‍लेषकांनी केला आहे. दरम्यान, उत्तर कोरियाच्या ताज्या क्षेपणास्त्र चाचणीमुळे तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

काही दिवसांपूर्वी उत्तर कोरियाने आपली सहावी आणि आतापर्यंतची सर्वांत मोठी अणू चाचणी घेतली होती. त्या वेळीही डागलेले क्षेपणास्त्र जपानवरून जात प्रशांत महासागरात कोसळले होते. ही हायड्रोजन बॉंबची चाचणी होती, तसेच तो क्षेपणास्त्रावर बसविण्यात येऊ शकेल एवढा लहान आकाराचा होता, असे उत्तर कोरियाने म्हटले होते. त्यानंतर "यूएन'च्या सुरक्षा परिषदेने उत्तर कोरियाविरुद्ध आठ नवे निर्बंध लादण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती. ताज्या क्षेपणास्त्र चाचणीनंतर "यूएन'च्या सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलविण्यात आली होती.
""उत्तर कोरियाने शुक्रवारी मध्यम पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची (आयआरबीएम) चाचणी घेतली. यामाध्यमातून अमेरिकेतील ग्वाम बेटांवर हल्ला करण्याची क्षमता विकसित केली असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या चाचणीमुळे अमेरिकेला कुठलाही धोका नाही,'' अशी प्रतिक्रिया अमेरिकेच्या प्रशांत महासागरातील लष्करी मुख्यालयातर्फे देण्यात आली. या क्षेपणास्त्राने सुमारे तीन हजार सातशे किलोमीटर अंतर कापले, तर 770 किलोमीटर एवढी उंची गाठली होती, अशी माहिती दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली.
क्षेपणास्त्रावर किती वजनाची स्फोटके बसविण्यात आली होती, याची माहिती मिळाली नसली, तरी या क्षेपणास्त्राद्वारे अमेरिकेतील ग्वाम बेटांवर उत्तर कोरिया हल्ला करू शकते, अशी शक्‍यता भौतिकशास्त्रज्ञ डेव्हिड राइट यांनी व्यक्त केली आहे.

जागतिक तणाव शिगेला
जागतिक महासत्तांनी कितीही दबाव टाकला तरी त्याला बळी न पडता उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जॉंग उन यांनी क्षेपणास्त्र चाचण्यांचा धडाका लावून दिला आहे. त्यामुळे जागतिक पातळीवरील तणावात प्रचंड वाढ झाली आहे. प्रत्येक क्षेपणास्त्र चाचणीनंतर किम जॉंग उन हे आपल्या सहकाऱ्यांचे आणि शास्त्रज्ञांचे अभिनंदन करतानाची छायाचित्रे सातत्याने प्रसारित केली जात आहेत. अमेरिकेने आत्तापर्यंत अनेकदा उत्तर कोरियाला गंभीर इशारे दिले असले तरी किम जॉंग उन यांनी त्यास दादा दिलेली नाही.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sole news North Korea again aggression; Again missile left from Japan