पोलिस आले अन् नवरा-नवरीला घेऊन गेले...

वृत्तसंस्था
Thursday, 9 April 2020

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेक देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. लॉकडाऊनच्या काळातही विवाह होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि ते नवरा-नवरीला घेऊन गेले.

कॅपेटाऊन (दक्षिण आफ्रिका): जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेक देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. लॉकडाऊनच्या काळातही विवाह होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि ते नवरा-नवरीला घेऊन गेले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हॉटस्पॉट म्हणजे काय? काय निर्बंध असतात...

The bride getting into a police vehicle

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कोरोना व्हायरसमुळे दक्षिण आफ्रिकेत लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन असतानाही जबुलानी जुलु (वय 48) आणि नोमथांड्जो (वय 39) विवाह करत होते. याबाबतची माहिती पोलिसांना समजल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हवेत गोळीबार करत विवाह थांबवला. नवरा-नवरीसह 50 नातेवाईकांना ते घेऊन गेले. त्यांना नंतर जामिनावर सोडण्यात आले आहे.

महिलेने चाटले लाखो रुपयांचे किराणा साहित्य...

दरम्यान, विवाहाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, एका लग्नाची गोष्ट चर्चेत आली आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोना व्हायरची 1,845 जणांना लागन झाली असून, 18 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सरकार वेगवेगळे उपाय करत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: south african bride and groom arrested over lockdown wedding