SpaceX ने महत्वपूर्ण रॉकेट प्रक्षेपण ऐनवेळी थांबवले; जाणून घ्या कारण...

SpaceX
SpaceX

वॉशिंग्टन - स्पेसएक्स या खाजगी कंपनीचे रॉकेट प्रक्षेपण शेवटच्या क्षणी थांबवण्यात आले आहे. खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. बुधवारी दुपारी 4 वाजून 33 मिनिटाला SpaceX रॉकेट प्रक्षेपण होणार होते. यातून नासाचे दोन अंतराळवीर प्रवास करणार होते. मात्र, ऐनवेळी हवामान खराब झाल्याने हे प्रक्षेपण आता शनिवारी करण्यात येणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

ड्रॅगन कैप्सूल असलेले स्पेसएक्स रॉकेट कॅनेडी स्पेस सेंटरच्या लॉन्च पॅड 39A वरुन उड्डान करणार होते. विशेष म्हणजे नील आर्मस्ट्राँग आणि अपोलो दलाची ऐतिहासिक यात्रा येथूनच चंद्रावर गेली होती.

मोहिमेआधी 20 मिनिटं अगोदर प्रेक्षपण थांबवावं लागल्याने लॉन्च डायरेक्टर माइक टेलर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. दुर्भाग्यपूर्ण, आज आम्ही प्रक्षेपण करु शकत नाही, असं ते म्हणाले आहेत. मात्र, शनिवारी पुन्हा याचे प्रक्षेपण केले जाणार आहे. जर ही मोहिम यशस्वी झाली तर असं पहिल्यांदा घडेल की कोण्या खासगी कंपनीने अशा प्रकारचं उड्डान यशस्वी केलं आहे. आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीन देशांनाच हे शक्य झालं आहे.

नासाचे अंतराळवीर डग हर्ली आणि बॉब बेन्कन हे ड्रॅगन कॅप्सूलसोबत बुधवारी दुपारी कॅनेडी स्पेस स्टेशनवरुन उड्डान करणार होते. पहिल्यांदाच एक खासगी कंपनी अंतराळवीरांना अंतराळात पाठवत आहे. मोहिमेपूर्वी  अंतराळवीर आणि स्पेसएक्स यांच्यासोबत जुडलेल्या लोकांना जर कोणत्याही प्रकारची चिंता वाटली किंवा अडचण आली तर ते कधीही प्रक्षेपण थांबण्यास स्वतंत्र असतील, असं कॅनेडी अंतरिक्ष केंद्रातील नासाचे डायरेक्टर जिम ब्रिडेन्सटाईन म्हणाले आहेत.

जगभरातील चिमुरड्यांचा जीव धोक्यात
 
ब्रिडेन्सटाईन यांनी सोमवारी दोन्ही अंतराळवीरांना संदेश पाठवला होता. जर तुम्हाला कोणत्याही कारणास्तव हे प्रक्षेपण थांबवावं वाटत असेल तर मला कळवा, मी ते ताबडतोब थांबवेन, अशी विचारणा त्यांनी केली होती होती. यावर, आम्ही या मोहिमेसाठी तयार आहोत, असं उत्तर अंतराळवीरांकडून आलं होतं.  

दरम्यान, बुधवारची मोहिम शक्य झाली नाही तर ती शनिवारी करण्याचं या अगोदरच ठरवण्यात आलं होतं. त्यामुळे आता प्रक्षेपण शनिवारी होणार असून याकडे जगाचं लक्ष लागलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com