अंतराळवीरांना घेऊन परतले ‘स्पेसएक्स ड्रॅगन’

वृत्तसंस्था
Tuesday, 4 August 2020

‘नासा’ने ४५ वर्षांनंतर प्रथमच अंतराळवीरांना थेट समुद्रात उतरविले. या घटनेचे थेट प्रक्षेपण ‘नासा’ आणि ‘स्पेसएक्स’ने केले. या पूर्वी अपोलो-सोयूझच्या चाचणी प्रकल्पाच्या अखेरिस ‘नासा’ने २४ जुलै १९७५ रोजी थॉमस स्टॅफर्ड, व्हेन्स ब्रॅन्ड आणि डोनाल्ड डेक स्लेटॉन या अंतराळवीरांना हवाई किनारपट्टीवरील प्रशांत महासागरात उतरविले होते.

न्यूयॉर्क - ‘नासा’ या अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेच्या दोन अंतराळवीर ‘स्पेसएक्स’ या खासगी कंपनीच्या पहिल्या व्यायसायिक यानातून रविवारी (ता.२) रात्री सुखरुप पृथ्वीवर परतले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

४५ वर्षांनी प्रथमच समुद्रात उतरले
‘नासा’ने ४५ वर्षांनंतर प्रथमच अंतराळवीरांना थेट समुद्रात उतरविले. या घटनेचे थेट प्रक्षेपण ‘नासा’ आणि ‘स्पेसएक्स’ने केले. या पूर्वी अपोलो-सोयूझच्या चाचणी प्रकल्पाच्या अखेरिस ‘नासा’ने २४ जुलै १९७५ रोजी थॉमस स्टॅफर्ड, व्हेन्स ब्रॅन्ड आणि डोनाल्ड डेक स्लेटॉन या अंतराळवीरांना हवाई किनारपट्टीवरील प्रशांत महासागरात उतरविले होते. 

इस्त्राईलने स्वत:भोवती तयार केलंय अदृष्य कवच; शत्रू राष्ट्राला हल्ला करणं सोपं नाही

‘पृथ्वीवर आपले स्वागत आहे’ 
रॉबर्ट बेनकेन आणि डग्लस हर्ले या अंतराळवीरांना घेऊन स्पेसएक्सच्या ‘क्रू ड्रॅगन ही अवकाश कुपी (कॅप्सूल) शनिवारी (ता.२) आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातून (आयएसएस) निघाली होती. त्या वेळी ‘आयएसएस’मधील अन्य तीन अंतराळवीरांनी त्यांना निरोप दिला. काल रात्री १२ वाजून २० मिनिटांनी (भारतीय प्रमाणवेळेनुसार) ही कॅप्सूल चार पॅराशूटच्या सहाय्याने फ्लोरिडातील पेन्साकोला किनारपट्टीवरील मेक्सिकोच्या खाडीत सुखरूप उतरली. त्यानंतर ‘गो नॅव्हिगेटर’ या जहाजावर कॅप्सूल आणण्यात आली. अंतराळवीर किनारपट्टीवर उतल्यावर त्यांना तातडीने हवाई मार्गाने ह्यूस्टनाला नेण्यात आले. बेनकेन व हर्ले हे पृथ्वीवर पोचल्यानंतर स्पेसएक्सच्या मोहिमेचे नियंत्रण करणाऱ्यांनी ‘पृथ्वीवर परत आल्याने आपले स्वागत आहे. स्पेसएक्सच्या उड्डाणाबद्दल धन्यवाद,’ असा संदेश दिला.

कोविड 19 संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केली भीती

ड्रॅगन कॅप्सूलची परतीची वाट

  • पृथ्वीच्या कक्षेतून २८ हजार किलोमीटर प्रतितास वेगाने पृथ्वीच्या दिशेने प्रवास
  • सुमारे ५६० हजार किलोमीटर प्रतितास वेगाने वायूमंडळात प्रवेश
  • अंतिम टप्प्यात २४ हजार किलोमीटर प्रतितास वेगाने मेक्सिकोच्या खाडीत उतरले
  • वातावरणात पोचल्यावर घर्षणामुळे कॅप्सूलचे तापमान १९०० अंश सेल्सिअसवर पोचले
  • पृथ्वीच्या दिशेने येताना कॅप्सूलवर गुरुत्वाकर्षणाचे बळ ४ ते ५ पटीने जास्त होते

पृथ्वीवर परतल्यावर...

  • कॅप्सूल समुद्रात उतल्यानंतर बाहेर काढण्यासाठी स्पेसएक्सचे जहाज ४० कर्मचाऱ्यांसह तयार होते
  • कर्मचाऱ्यांमध्ये डॉक्टर, परिचारिका आदी
  • कोरोनामुळे कर्मचाऱ्यांचे १४ दिवस विलगीकरण केले होते. कोरोना चाचणीही केली होती

अयोध्या: पंतप्रधान मोदींसह केवळ 5 व्यक्ती असणार व्यासपीठावर

१९ तासांचा प्रवास 
‘नासा’च्या स्पेसएक्स डेमो-२ या चाचणी मोहिमेअंतर्गत अंतराळयानाने फ्लोरिडातील केनेडी अवकाश स्थानकावरून ३० मे रोजी उड्डाण केले होते. यान कक्षेत पोचल्यावर बेनकेन आणि हर्ले यांनी त्यांच्या क्रू ड्रॅगन अंतराळयानाचे नामकरण ‘एंडेव्हर’ असे केले होते. प्रत्येक अंतराळवीराला अवकाशात घेऊन जाणाऱ्या पहिल्या अवकाशयानाच्या स्मृतीनिमित्त हे नाव त्यांनी दिले होते. सुमारे १९ तासांचा प्रवास करीत ‘क्रू ड्रॅगन’ने ३१ मे रोजी दोन्ही अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ यानापर्यंत पोचविले होते.

अंतराळवीर ४५ वर्षांनी प्रथमच समुद्रात उतरले ही अत्यंत रोमांचक घटना आहे.
- डोनाल्ड ट्रम्‍प, अध्यक्ष, अमेरिका

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SpaceX Dragon returns with astronauts