ऐतिहसिक दिवस! स्पेनमध्ये महिलांना मिळणार मासिक पाळीची रजा; कायदा मंजूर

spain approves law creating europes first menstrual leave
spain approves law creating europes first menstrual leaveesakal

माद्रितः स्पेनमध्ये आज ऐतिहासिक कायदा मंजूर झाला आहे. या कायद्यान्वये मासिक पाळीमध्ये महिलांना रजा मिळेल. हा कायदा आणणारा स्पेन हा युरोपतला पहिला देश ठरला आहे.

स्पॅनिश संसदेमध्ये या कायद्याच्या बाजूने १८५ मतं तर विरोधात १५४ मतं पडली. मासिक पाळीमध्ये महिलांना वेदना सहन कराव्या लागतात, त्यामुळे त्यांना वैद्यकीय रजेची गरज असते. शिवाय मासिक पाळीबद्दल गैरसमज दूर करण्यचा उद्देश असल्याचं स्पेन सरकारने म्हटलं आहे.

सध्या जपान, इंडोनेशिया आणइ झांबिया या देशांमध्ये महिलांना मासिक पाळीमध्ये वैद्यकीय रजा दिली जाते. या देशांच्या यादीमध्ये आता स्पेनचा समावेश झाला आहे. स्पेनच्या मंत्री इरेन मोटेरा यांनी सांगितलं की, स्त्रीयांच्या हक्कांसाठी टाकलेलं हे एक ऐतिहासिक पाऊल आहे.

स्पॅनिश प्रसुतीशास्त्र आणि स्त्रीरोग सोसायटीच्या मते मासिक पाळी सुरु असलेल्या एक तृतियांश महिलांना मोठ्या प्रमाणावर वेदना होतात. त्यामुळे महिलांना रजा मिळणे आवश्यक आहे. ही रजा किती दिवस मिळणार, हे डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार ठरवण्यात येणार आहे. याशिवाय इतर आरोग्यविषयक रजा ह्या सशुल्क रजेप्रमाणे किंवा डॉक्टरांच्या अहवलाप्रमाणे मिळणार आहेत.

या कायद्यानुसार अल्पवयीन मुलींना पालकांच्या परवानगीशिवाय गर्भपात करता येणार आहे. २०१५मधील कायद्याच्या हे अगदी उलट आहे. युरोपामध्ये स्त्रीवादी संघटना हा दिवस ऐतिहासिक समजत आहेत. कारण महिलांच्या हक्कासाठी हे मोठं पाऊल आहे, असं म्हटलं जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com