नेपाळच्या ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव

कोरोनाने नेपाळमध्ये हाहा:कार माजविला असून काही दिवसांपूर्वी ४० टक्क्यांपेक्षा अधिक पॉझिटिव्हीटी रेट असल्याने ७७ पैकी ७५ जिल्ह्यात संपूर्णपणे लॉकडाउन लागू करण्यात आले.
Covid Vaccination
Covid VaccinationSakal

काठमांडू - कोरोनाने (Corona) नेपाळमध्ये (Nepal) हाहा:कार माजविला असून काही दिवसांपूर्वी ४० टक्क्यांपेक्षा अधिक पॉझिटिव्हीटी रेट (Positive Rate) असल्याने ७७ पैकी ७५ जिल्ह्यात संपूर्णपणे लॉकडाउन (Lockdown) लागू करण्यात आले. राजधानी काठमांडू (Kathmandu) येथे ४५ दिवसांच्या कडक लॉकडाउननंतर काही प्रमाणात रुग्णसंख्या (Patient) कमी झाली आहे. परंतु आता ग्रामीण भागात संसर्ग पसरत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात ऑक्सिजनची पातळी तपासणारे ऑक्सिमीटरचा देखील वाणवा आहे. (Spread of Corona in Rural Nepal)

नेपाळमधील कोरोनाचे संकट भारतापेक्षा अधिक गंभीर होत चालले आहे. पावणे तीन कोटींची लोकसंख्या असलेल्या लहान देशात ६ लाखांहून अधिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी निम्मे रुग्ण राजधानीतील आहेत. चाचणीचे प्रमाण कमी असतानाही रुग्णांची संख्या मात्र वाढली आहे. नेपाळमध्ये आतापर्यंत ८२३८ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात गुरुवारपर्यंत ३१,८९,१०४ जणांची आरटी पीसीआर चाचणी केली आहे. त्याचवेळी ९१,३६८ जणांची ॲटीजेन चाचणी केली आहे.

Covid Vaccination
आता आपला नकाशा करा अपडेट; जगात चार नव्हे, तर पाच महासागर

पॉझिटिव्हीटी रेटच्या बाबतीत नेपाळ जगातील सर्वाधिक बाधित देशाच्या यादीत सामील आहे. नेपाळमध्ये बहुतांश भागातील पॉझिटिव्हीटी रेट २० टक्कयांपेक्षा अधिक आहे तर राष्ट्रीय सरासरी २८ टक्के आहे. तीन आठवड्यापूर्वी नेपाळमध्ये सरासरी पॉझिटिव्हीटी रेट हा ४४.६७ टक्के होता आणि तो जगात सर्वाधिक होता. त्यामुळे कोविडचा मुकाबला करण्यासाठी देशात कडक लॉकडाउन लागू करण्यात आला आणि परिणामी रुग्णसंख्येत घट झाली. नेपाळच्या शहरी भागातील रुग्णांची संख्या कमी होत असली तरी ग्रामीण भागात संसर्गाचा प्रसार होत आहे. ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्था एवढी बिकट आहे की तेथे ऑक्सिमीटर आणि एक्स रे मशिन देखील सहजासहजी उपलब्ध होत नाही.

लसीकरणाचे संकट

नेपाळमध्ये आतापर्यंत ७ लाखांपेक्षा कमी लोकांना दोन डोस मिळाले तर २१ लाख लोकांना पहिला डोस मिळाला आहे. लस उपलब्ध नसल्याने देशात २८ एप्रिलला लसीकरण थांबवण्यात आले. एक मे नंतर दुसरा डोस दिला गेला. आता चीनमधून लस आल्यानंतर ८ जूनपासून पुन्हा लसीकरण सुरू झाले आहे. लशीच्या टंचाईबाबत यूनिसेफने चिंता व्यक्त केली आहे. यूनिसेफच्या लिली केपरानी यांच्या मते, नेपाळच्या काही भागात ४० टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना बाधा झाल्याने तेथील व्यवस्था कोलमडून पडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com