florida
florida

एक गाव विमानांचं, रस्त्यावर गाड्यांप्रमाणे पार्क केलं जातं विमान

फ्लोरिडा - जगात अशी अनेक गावं आहे ती काही खास कारणासाठी ओळखली जातात. एक गाव असं आहे जिथं प्रत्येकाचं स्वत:च्या मालकीचं विमान आहे. आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. इथं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी विमानाचे बूकिंग केलं जातं. ऑनलाइन फ्लाइट  तिकीट बुक करता येतात. डेटोना बीचपासून काही किमी अंतरावर फ्लोरिडामध्ये स्प्रूस क्रीक हे जगातील एकमेव विमानाचं गाव आहे. 

स्प्रूस क्रीकला रेसिडेन्शियल एअरपार्क किंवा फ्लाय इन कम्युनिटी म्हणून ओळखले जाते. स्प्रूस क्रीकमध्ये जवळपास 5 हजार लोकं राहतात. याठिकाणी 1 हजार घरे आहेत. खाजगी एअरफिल्ड असलेल्या याठिकाणी लोक एन्जॉय करतात. स्प्रूस क्रीकचे लोक सोसायटीत राहतात आणि त्यातले बरचेसे व्यावसायाने पायलट आहेत.

गावातील पायलटना तुम्ही विमान चालवण्यासाठी बोलावू शकता. तसंच इथं इतर व्यावसायिकसुद्धा राहतात. यामध्ये डॉक्टर, वकील किंवा इतर उद्योग करणारेही राहतात. मात्र या सर्वांमध्ये एक वेड आहे ते म्हणजे विमान चालवण्याचं. दर शनिवारी सकाळी ते धावपट्टीवर जमलेले असतात. तिघा तिघांच्या गटाने ते तिथल्या लोकल विमानतळावर जातात. त्यांच्याकडे याला Saturday Morning Gaggle अशी एक परंपरा म्हणूनच ओळखलं जातं. 

स्प्रूस क्रीकमध्ये घरामध्ये गॅरेजच्या जागी हँगर असतं. तिथून ते थेट ड्राइव्ह वे जीपीएसद्वारे जोडले जाऊन जवळच्याच धावपट्टीकडे जातात. या गावातील रस्त्यांवर जागोजागी विमाने दिसतील. इथं एक 18 होलचं गोल्फ कोर्सही आहे. अशा ठिकाणी कमी उंचीवरून उडणाऱ्या विमानांमुळे टीनिंग करणं धोकादायक ठरू शकतं. स्प्रूस क्रीकमधील रस्त्यावर फ्लाइंग क्लब, रेन्टल एअरक्राफ्ट, फ्लाइट ट्रेनिंग आणि 24 तास सुरक्षा असते. जर तुम्हालाही विमानांची आवड असेल तर स्प्रूस क्रीक हे नंदनवनच ठरेल. 

प्रत्येकाकडे  लहान मोठं विमान या गावामध्ये आहे. यामध्ये सेसना विमान,  पी-51 मस्टॅग, एल-39 एलब्रेट्रोस आणि एकलिप्स 500 नावाच्या विमानांचा समावेश आहे. यातील सर्वाधिक विमानं ही लहान आकाराची आहेत. याशिवाय इथं रशियन मिग 15 प्लेनसुद्धा काही जणांकडे आहे. रस्त्यावर गाड्या पार्क केल्याप्रमाणेच इथं विमाने पार्क केलेली दिसतात. 

Edited By - Suraj Yadav

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com