सरकारसमर्थकांना पकडण्यासाठी पोलिसांवर दबाव

श्रीलंकेतील पेच : हल्लेखोरांना पकडण्यासाठी सहकार्याचे आवाहन , भारताकडून आैषध पुरवठा
sri lanka Appeal for cooperation apprehending attackers Mahinda Rajapaksa supply of medicines from India
sri lanka Appeal for cooperation apprehending attackers Mahinda Rajapaksa supply of medicines from Indiasakal

कोलंबो : गेल्या आठवड्यात झालेल्या हिंसाचारप्रकरणी समाजकंटक आणि सरकारसमर्थक नागरिकांना पकडण्यासाठी पोलिसांवर दबाव वाढत चालला आहे. माजी पंतप्रधान महिंदा राजपक्ष यांच्या समर्थकांनी आंदोलकांवर हल्लाबोल केला होता आणि त्यानंतर नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला. त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात नऊ जणांचा मृत्यू झाला अडीचशे जण जखमी झाले. हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत २०० जणांना अटक करण्यात आली आहे.

महिंदा राजपक्ष यांच्या राजीनाम्यानंतर देशात होत असलेल्या हिंसाचाराला पायबंद घालण्यासाठी अध्यक्ष गोटाबया राजपक्ष यांनी संचारबंदी लागू केली. तरीही काही भागात हिंसेच्या घटना घडत आहेत. युवा वकील संघाचे नुवान बोपेज यांनी पत्रकारांनी बोलताना म्हटले, की, पोलिसांनी आतापर्यत नेत्यांवरील हल्ल्याप्रकरणी २०० हून अधिक जणांना अटक केली आहे. आम्ही अशा हिंसाचाराचा निषेध करतो. परंतु सरकार समर्थकांनी घातलेल्या हिंसाचारप्रकरणी अटक करण्याची पोलिसांना घाई दिसत नाही. ॲटर्नी जनरलनी देखील पोलिसांना तपासात वेग आणण्याची मागणी केली आहे.

सरकार समर्थक समाजकंटकांना अटक करण्यासाठी पोलिसांनी दबाव वाढत असून सरकार समर्थक हल्लेखोरांची माहिती देण्याचे आवाहन जनतेला करण्यात आले आहे. दरम्यान, कोलंबो येथील मोरातुवा उपनगर येथील सत्ताधारी पक्षाच्या ताब्यात असलेल्या नगरपालिकेच्या एका सदस्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हल्लेखोरांची अधिकाधिक माहिती मिळावी यासाठी फोन क्रमांकांची संख्या वाढविली आहे. त्याचवेळी सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी संभाव्य हल्ल्याची शक्यता पाहता अतिरिक्त सुरक्षेची मागणी केली आहे.

‘एलटीटीई’चा इशारा

आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेवर लिबरेशन टायगर्स ऑफ तमीळ ईलम म्हणजेच एलटीटीईच्या हल्ल्याची शक्यता वर्तविली जात आहे. भारतीय गुप्तचर संस्थेने देखील श्रीलंकेच्या सरकारला संभाव्या हल्ल्याचे संकेत दिले आहेत. यानुसार १८ मे रोजी लिट्टे मोठा हल्ला घडवून आणू शकतात, असे म्हटले आहे. त्यामुळे श्रीलंकेने सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. तत्पूर्वी श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रालयाने एका भारतीय इंग्रजी वर्तमानपत्रात हल्ल्याच्या शक्यतेबाबत छापलेल्या बातमीचा इन्कार केला. भारताकडून हल्ल्यासंदर्भात कोणतीही सूचना मिळाली नसल्याचे म्हटले होते.

औषधांची टंचाईमुळे रुग्णांचे हाल

श्रीलंकेत आर्थिक संकट वाढत असताना औषधांची टंचाई निर्माण झाली आहे. औषधांबरोबरच सर्जिकल उपकरणे देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. त्यामुळे हृदयविकार असलेल्या रुग्णांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. आरोग्य मंत्रालयाचे सचिव मेजर जनरल संजीव मुनासिंघे यांनी देशात आरोग्य उपकरणांची प्रचंड टंचाई असल्याचे पंतप्रधान कार्यालयाच्या बैठकीत सांगितले. रुग्णांवर उपचार करणाऱ्या दवाखान्यांना गेल्या चार महिन्यांपासून औषध, सर्जिकल उपकरणे आणि आहारापोटी पैसे मिळालेले नाहीत. डॉलरच्या कमतरतेमुळे औषधी आणि वैद्यकीय उपकरणे आयात केलेले नसल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com