Sri Lanka : पेट्रोलसाठी तासंतास रांगेत उभे राहू नका, सरकारचे आवाहन

28 मार्चपासून श्रीलंकेच्या सागरात उभे असल्याचे ऊर्जामंत्री कांचन विजेसेकरा यांनी संसदेला सांगितले.
Sri Lanka
Sri LankaSakal

कोलंबो : गंभीर आर्थिक संकटाचा सामना करणार्‍या श्रीलंकेने त्यांच्याकडे पेट्रोल खरेदीसाठी पैसे नसल्याचे बुधवारी उघडपणे कबूल केले आहे. तसेच श्रीलंकन सरकारने नागरिकांना इंधनासाठी तासंतास रांगेत उभे न राहण्याचे आवाहनही केले आहे. पेट्रोल घेऊन आलेले एक जहाज 28 मार्चपासून श्रीलंकेच्या सागरात उभे असल्याचे ऊर्जामंत्री कांचन विजेसेकरा यांनी संसदेला सांगितले. परंतु, पेट्रोलच्या जहाजाचे पैसे देण्यासाठी त्यांच्याकडे परकीय चलन नसल्याचे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Sri Lanka
कृष्ण जन्मभूमी खटला : शाही इदगाह मशीद हटवण्याची याचिका मंजूर

पेट्रोलच्या शिपमेंटसाठी पैसे नाहीत

ऊर्जा मंत्री कांचना विजेसेकेरा यांनी संसदेत सांगितले की, पेट्रोलसह एक जहाज 28 मार्चपासून श्रीलंकेच्या सागरात अभे आहे. परंतु, सरकारकडे पेट्रोलच्या या जहाजाचे पैसे देण्यासाठी परकीय चलन नाही. जानेवारी 2022 मध्ये आलेल्या शेवटच्या शिपमेंटसाठी आधीच USD 53 दशलक्ष कर्ज घतल्याचेही त्यांनी यावेळी संसदेत सांगितल. संबंधित शिपिंग कंपनीने दोन्ही देयके पूर्ण होईपर्यंत जहाज सोडण्यास नकार दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी पेट्रोलसाठी तासंतास रांगेत उभे राहू नये, अशी विनंतीदेखील विजेसेकेरा यांच्याकडून नागरिकांना करण्यात आले आहे.

देशात डिझेलची समस्या नसल्याचे सांगितले. परंतु, पेट्रोलचा मर्यादित साठा असून, ते अत्यावश्यक सेवांसाठी, विशेषत: रुग्णवाहिकांसाठी वितरित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

Sri Lanka
काश्मिरी फुटीरतावादी नेता यासिन मलिक टेरर फंडिंग प्रकरणात दोषी

इंधन साठवणूक थांबवण्याचे आवाहन

यासोबतच विजेसेकेरा यांनी लोकांना इंधन साठवणूक बंद करण्याचे आवाहन केले. विजेसेकेरा म्हणाले की, सर्व फिलिंग स्टेशनवर पेट्रोलचे वितरण पूर्ण होण्यास काही दिवस लागतील. मंगळवारी आम्ही देशातील सर्व फिलिंग स्टेशनवर सुपर डिझेल आणि ऑटो डिझेलचे वितरण केल्याचे त्यांनी सभागृहाला सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com