ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जानेवारी 2017

वॉशिंग्टन : मुस्लिमबहुल सात देशांमधील नागरिकांच्या अमेरिका प्रवेशास अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विशेष आदेश देत बंदी घातली असली तरी, या आदेशाच्या अंमलबजावणीस येथील न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ट्रम्प यांच्या आदेशानंतर ताब्यात घेतलेल्या निर्वासितांना आणि इतर व्हिसाधारकांना विमातळावरूनच परत पाठविण्यास तात्पुरती बंदी घालणारा आदेश न्यूयॉर्क येथील जिल्हा न्यायाधीश ऍन डोनली यांनी दिला आहे.

ट्रम्प यांच्या निर्णयाविरोधात येथील एका नागरी हक्क संघटनेने दोन इराकी नागरिकांच्या वतीने याचिका दाखल केली होती. या नागरिकांकडे सर्व अधिकृत कागदपत्रे असतानाही त्यांना आदेशामुळे विमानतळावरच पोलिसांनी ताब्यात घेतले होते. "अमेरिका सरकारने मंजूर केलेला प्रवेशअर्ज असलेले निर्वासित, अधिकृत व्हिसा असलेले नागरिक आणि अमेरिकेत प्रवेश करण्याचा अधिकृत परवाना असलेले इराक, सीरिया, इराण, सुदान, लीबिया, सोमालिया आणि येमेनमधील नागरिक यांना हाकलून देता येणार नाही,' असे या याचिकेवर निकाल देताना न्या. डोनली यांनी स्पष्ट केले.

ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकेतील सर्व विमानतळांवर ताब्यात घेतलेल्या नागरिकांची यादी सादर करण्याचे आदेशही त्यांनी या वेळी अमेरिका सरकारला दिले. या नागरिकांना परत पाठविताना त्यांच्या जीवाला धोका पोचण्याची शक्‍यता असल्याचे न्या. डोनली यांनी म्हटले आहे.

Web Title: stay to trump's decision