स्टिफन हॉकिंग यांची व्हिलचेअर 'मूल्य'वान 

पीटीआय
शनिवार, 10 नोव्हेंबर 2018

लंडन : विश्‍वनिर्मितीचे गूढ उकलण्याचा प्रयत्न करणारे विख्यात खगोल-भौतिक शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग यांना "मोटार न्यूरॉन डिसिज' या दुर्धर आजारामुळे त्यांचे जवळजवळ निम्मे आयुष्य व्हिलचेअरवर गेले. निधनानंतर त्यांची स्मृती बनलेल्या व्हिलचेअरचा गुरुवारी (ता. 8) लिलाव करण्यात आला. त्यात तीन लाख पाउंड एवढी किंमत मिळाली.

लंडन : विश्‍वनिर्मितीचे गूढ उकलण्याचा प्रयत्न करणारे विख्यात खगोल-भौतिक शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग यांना "मोटार न्यूरॉन डिसिज' या दुर्धर आजारामुळे त्यांचे जवळजवळ निम्मे आयुष्य व्हिलचेअरवर गेले. निधनानंतर त्यांची स्मृती बनलेल्या व्हिलचेअरचा गुरुवारी (ता. 8) लिलाव करण्यात आला. त्यात तीन लाख पाउंड एवढी किंमत मिळाली.

लिलावातून मिळालेला सर्व पैसा सामाजिक कामांसाठी देण्यात येणार असल्याचे या वेळी संयोजकांनी सांगितले. हॉकिंग (वय 76) यांचे निधन मार्च महिन्यात झाले. अत्यंत तल्लख बुद्धी असलेल्या हॉकिंग यांना 23 व्या वर्षीच "मोटार न्यूरॉन डिसिज' या रोगाने ग्रासले. तेव्हापासून व्हिलचेअर ही त्यांची साथीदार बनली. या व्हिलचेअरसह त्यांचे काही शोधिनबंध, त्यांना मिळालेली पदके, स्मृतिचिन्हे, "ब्रिफ हिस्टरी ऑफ टाइम' त्या पुस्तकाची त्यांच्या सही व अंगठ्याचा शिक्का असलेली प्रत याची विक्री काल ऑनलाइन करण्यात आली. याचबरोबर आयझॅक न्यूटन, चार्ल्स डार्विन, अल्बर्ट आइनस्टाईन यांची पत्रे व हस्तलिखिते यांचीही विक्री झाली. 

हॉकिंग यांनी सादर केलेला "प्रॉपर्टी ऑफ एक्‍सपान्डिंग युनिव्हर्स' या 117 पानी शोधनिबंधाची विक्री पाच लाख 84 हजार 750 पाउंडला झाली. याची अपेक्षित किंमत एक लाख 50 हजार पाउंड होती. पदके आणि स्मृतिचिन्हांना 15 हजार पाउंड मिळतील, असा अंदाज होता. त्यांना दोन लाख 96 हजार 750 पाउंड एवढी किंमत मिळाली. हॉकिंग यांची लाल रंगाची स्वयंचलित व्हिलचेअरनेही दोन लाख 96 हजार 750 पाउंड मिळविले. 

नऊ दिवस सुरू होता लिलाव 

"स्टिफन हॉकिंग फाउंडेशन अँड मोटार न्यूरॉन डिसिज असोसिएशन' या संस्थांच्या मदतीसाठी हॉकिंग यांच्या वस्तूंचा ऑनलाइन लिलाव "ख्रिस्तीज' या संस्थेद्वारा करण्यात आला. "ऑन द शोल्डर्स ऑफ जायंटस' या नावाने नऊ दिवस लिलाव सुरू होता. स्टिफन हॉकिंग यांचे व्यक्तिमत्त्व जगभरात प्रसिद्ध होते. जगातील नागरिकांशी संबंध जोडण्याची कला त्यांच्याकडे होती, असे गौरवोद्‌गार लंडनमधील "ख्रिस्तीज'चे ग्रंथ व हस्तलिखित विभागाचे प्रमुख थॉमस व्हेनिंग यांनी काढले. 

लिलावातील वस्तूंना मिळालेली किंमत (आकडे पाउंडमध्ये) 
2, 96, 750 
व्हिलचेअर 

5,84, 750 
शोधनिबंध 

2, 96, 750 
पदके व स्मृतिचिन्हे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stephen Hawking Wheelchair is Valuable