दहशतवादी संघटनांचे 'फंडिंग' थांबवा

दहशतवादी संघटनांचे 'फंडिंग' थांबवा

वॉशिंग्टन : संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने घोषित केलेल्या दहशतवादी संघटनांना आणि त्यांच्या नेत्यांना पाकिस्तानने पाठिंबा देण्याचे आणि अर्थसाह्य करण्याचे तात्काळ थांबवावे, असे आवाहन आज अमेरिकेने केले. जैशे मोहंमदसारख्या दहशतवादी संघटना भविष्यात हल्ले करणार नाहीत, यासाठी पाकिस्तानने उपाययोजना कराव्यात, असेही अमेरिकेने म्हटले आहे. 

पाकिस्तानस्थित जैशे मोहंमद संघटनेने पुलवामा येथे घडवून आणलेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे चाळीस जवान हुतात्मा झाले. तसेच पाच जण गंभीर जखमी झाले. यासंदर्भात अमेरिकी स्टेटच्या प्रवक्‍त्याने म्हटले, की 2002 मध्ये पाकिस्तानने जैशे मोहंमद संघटनेविरुद्ध कारवाई केली होती. मात्र ही संघटना अजूनही पाकिस्तानात सक्रिय आहे. अमेरिकेने जैशे मोहंमदला डिसेंबर 2001 मध्ये परकी दहशतवादी संघटनेच्या यादीत टाकले आहे. यानुसार अमेरिका काम करत आहे. भारतीय उपखंडात दहशतवादी हल्ले घडवून आणणाऱ्या संघटनांना पाकिस्तानने थारा देऊ नये. पाकिस्तानने दहशतवादी कारवाया करणाऱ्या संघटनांना आणि त्यांच्या नेत्यांना आर्थिक पाठबळ देण्याचे थांबवावे, असे आवाहन करण्यात आले.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या नियमाचे पालन पाकिस्तान करेल, अशी अपेक्षा अमेरिकेने व्यक्त केली आहे. जैशेचा म्होरक्‍या मसूद अझहरला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना चीन खोडा घालत असल्याबद्दल विचारले असताना अमेरिकेने थेटपणे उत्तर देण्याचे टाळले. मात्र जैशे मोहंमद आणि मसूद अझहर यांच्या कारवाया जगाला ठाऊक असून भारतीय उपखंडात अनेक हल्ल्यामागे जैशे मोहंमदचा हात आहे, असे मोघम उत्तर अमेरिकेच्या प्रवक्‍त्याने दिले.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत होणारी चर्चा, निर्णय गोपनीय असतात, त्यामुळे परिषदेशी निगडित एखाद्या मुद्‌द्‌यावर मत देणे उचित नसल्याचे अधिकाऱ्याने नमूद केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com