Donald Trump : ज्या पॉर्नस्टारने ट्रम्प यांच्यावर आरोप केले तिने घेतला युटर्न, म्हणाली...

पॉर्न स्टार स्टॉर्मी डेनियलशी संबंधित प्रकरणात मॅनहॅटन कोर्टाने ट्रम्प यांना हा दंड ठोठावला आहे.
Donald Trump
Donald Trump

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 1 लाख 22 हजार डॉलर म्हणजे 1,00,14,010.10 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. पॉर्न स्टार स्टॉर्मी डेनियलशी संबंधित प्रकरणात मॅनहॅटन कोर्टाने ट्रम्प यांना हा दंड ठोठावला आहे. या प्रकरणात ट्रम्प यांनी कोर्टाला समोर स्वत:ला सरेंडर केलं होतं. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र, सध्या त्यांची सुटका करण्यात आली. दरम्यान, ज्या पॉर्नस्टारने ट्रम्प यांच्यावर आरोप केले तिने युटर्न घेतला आहे. (Stormy Daniels says Trump should not go to prison in hush money case)

ट्रम्प दोषी आढळले असले तरी त्यांना तुरुंगवासाची शिक्षा होऊ नये. फॉक्स न्यूजशी बोलताना पॉर्नस्टार डेनियलने प्रतिक्रिया व्यक्त केली. "माझ्यावरील त्याचे गुन्हे तुरुंगात जाण्यास पात्र आहेत असे मला वाटत नाही." असही डॅनियल्स म्हणाली.

पॉर्नस्टार डेनियलने फॉक्स न्यूजशी संवाद साधला. यावेळी तिने ट्रम्प यांच्या शिक्षेवर भाष्य केलं. स्टॉर्मी डॅनियल्सची मुलाखत घेणार्‍या मॉर्गनने आपल्या ट्विटर पोस्टमध्ये 44 वर्षीय डॅनियल्सची 90 मिनिटांची मुलाखत 'आश्चर्यकारक' असल्याचे म्हटले आहे.

'मी नुकतीच स्टॉर्मी डेनियलसोबत ९० मिनिटांची मुलाखत पुर्ण केली आहे. यावेळी तिने ट्रम्प यांच्यावर भाष्य केलं.

Donald Trump
Donald Trump: आपला देश नरकात जात आहे...कोर्टाच्या निर्णयानंतर ट्रम्प यांची पहिलीच प्रतिक्रिया

मंगळवारी या प्रकरणी ट्रम्प न्यूयॉर्कमधील न्यायालयात हजर झाले. त्यांच्यावर 34 गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. यामध्ये स्टॉर्मी डेनियल आणि प्लेबॉयची माजी मॉडेल कॅरेन मॅकडोगल यांच्यावर शारीरिक संबंध असल्याच्या बातम्यांवर तोंड बंद ठेवण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप आहे.

मात्र, ट्रम्प यांनी न्यायालयात सांगितले की, ते पूर्णपणे निर्दोष असून राजकीय षड्यंत्राखाली त्यांना गोवण्यात येत आहे. स्टॉर्मी डेनियलसोबत आपला कोणताही संबंध नसल्याचेही त्याने सांगितले.

Donald Trump
Donald Trump Stormy Daniels: ट्रम्प-पॉर्न स्टार प्रकरण नेमकं आहे तरी काय? स्टॉर्मीने ट्विट करून म्हटलं...

यावर मॉर्गनने तु साक्ष देशील का असे विचारले असता, हे आव्हानात्मक आहे, परंतु मी त्याची वाट पाहत आहे." मला काय म्हणायचे आहे ते तुम्हाला माहिती आहे? कारण माझ्याकडे लपवण्यासारखे काही नाही. मीच खरे बोलतीय आणि तुम्हाला माहिती आहे, या गोष्टी आता मला लाजवू शकत नाहीत. असी प्रतिक्रिया स्टॉर्मी डेनियलने व्यक्त केली.

16 पानांचं आरोपपत्र

डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर 16 पानांचं आरोपत्र दाखल करण्यात आलं आहे. ट्रम्प यांनी नियमांचं उल्लंघन केलं. 2016च्या अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत नकारात्मक बातम्या छापून येऊ नये, खासकरून पॉर्न स्टारशी असलेल्या संबंधाच्या बातम्या छापल्या जाऊ नये म्हणून ट्रम्प यांनी ही रक्कम मोजल्याचा आरोप वकिलांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com