सुएझमध्ये अडकलेल्या जहाजाला 3 दिवसात बाहेर काढण्याची योजना

suez
suez

सुएझ - जगप्रसिद्ध सुएझ कालव्यात गेल्या पाच दिवसांपासून अडकून पडलेले पनामाचे एव्हर गिव्हन हे महाकाय मालवाहतूक जहाज बाहेर काढण्यासाठी इजिप्तच्या अधिकाऱ्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. पुढील तीन दिवसात गाळात अडकलेले हे मालवाहू जहाज बाहेर काढून सुएझ कालवा पुर्ववत वाहतुकीसाठी खुला करण्याची योजना आखण्यात आलेली आहे. पूर्व आणि पश्चिम जगातील महासागरांना सागरी कालव्याद्वारे जोडणाा सुएझ कालवा जागतिक व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. सुएझ कालव्यात मंगळवारी एव्हर गिव्हन हे जहाज तेथून मार्गक्रमण करत असताना जोरदार वादळामुळे कालव्याच्या एका किनाऱ्याला धडकून गाळात अडकले आहे. जगातील महाकाय मालवाहतूक जहाजांमध्ये समावेश असलेल्या एव्हर गिव्हनवर जवळपास पाच हजार कंटेनर आहेत. त्यात पेट्रोकेमिकल्स, अन्नधान्य, द्राक्षे, औषधी रसायने यंत्रसामग्री आदींचा समावेश आहे. कालव्याच्या मधोमध हे जहाज अडकल्याने भूमध्य समुद्र, लाल समुद्र आणि तसेच आखाती देशालगतच्या अरबी समुद्रात सुमारे ३२१ मालवाहतूक जहाजे पाच दिवसांपासून समुद्रातच नांगर टाकून उभी आहेत. सुएझ कालव्याच्या कोंडीने तूर्त दहा अब्ज डॉलरचा जागतिक व्यापार अडकून पडला असून प्रत्येक दिवशी हा आकडा वाढत चालला आहे. आशिया आणि युरोप यांच्यातील व्यापाराला ब्रेक मिळालेला असून अनेक भारतीय कंपन्या कच्या मालाअभावी अडचणीत आलेल्या आहेत. भारतातून शीत कंटेनरच्या माध्यमातून होणारी फळभाज्यांची निर्यातसुद्धा ठप्प झालेला आहे.

एव्हर गिव्हनला बाहेर काढण्यासाठी नव्याने योजना तयार करण्यात आल्याची माहिती कालव्याचे प्रमुख अधिकारी लेफ्टनंट जनरल ओसामा राबेई यांनी दिली. येत्या दोन दिवसात अतिशय हेवी टगबोटच्या साहाय्याने हे जहाज एका बाजूने ओढले जाणार आहेत. समुद्राला असलेल्या भरतीवेळी तसेच जहाजाचे जे टोक गाळात अडकलेले आहे, तेथील मातीचे खणन काढून हे जहाज मोकळे करण्याची योजना आहे. येत्या बुधवारपर्यंत ही मोहीम पूर्ण होईल. परंतु त्यात अपयश आल्यास जहाजावरील काही कंटेनर जमिनीवर उतरवून ते हलके केले जाणार आहे आणि पुन्हा त्याला टगबोटींच्या साहाय्याने तेथून हलविले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अमेरिकेने या कामी इजिप्तला मदत देऊ केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी अडकलेले जहाज बाहेर काढण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञान जगातील अनेक देशांकडे नसून ते अमेरिकेकडे आहे. इजिप्तला याकामी आम्ही मदत करु शकतो, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. गतवर्षी १९ हजार जहाजांची वाहतूक सुएझ कालव्यातून गेल्या वर्षी तब्बल १९ हजार मालवाहतूक जहाजांनी व्यापार केला. जगाच्या एकूण व्यापारापैकी दहा टक्के व्यापार हा सुएझ कालव्यातून होतो. हा कालवा बंद पडल्याने आखाती देश आणि युरोप यांच्यातील पेट्रोल- डिझेल इंधनाची वाहतूक पूर्णपणे थांबली आहे.

गतवर्षी १९ हजार जहाजांची वाहतूक
सुएझ कालव्यातून गेल्या वर्षी तब्बल १९ हजार मालवाहतूक जहाजांनी व्यापार केला. जगाच्या एकूण व्यापारापैकी दहा टक्के व्यापार हा सुएझ कालव्यातून होतो. हा कालवा बंद पडल्याने आखाती देश आणि युरोप यांच्यातील पेट्रोल- डिझेल इंधनाची वाहतूक पूर्णपणे थांबली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com