काबुलमध्ये आत्मघाती हल्ल्यात 21 मृत्यूमुखी, पत्रकारांचाही समावेश 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

या हल्ल्यात फ्रान्स प्रेस एजन्सीचे मुख्य फोटोग्राफर शाह मराई व आणखी तीन पत्रकारांचाही समावेश आहे. अशी माहिती तेथील आरोग्य मंत्र्यांनी दिली.  

काबुल (अफगाणिस्तान) : अफगाणिस्तानमधील काबुल येथे आज (ता. 30) सकाळी काही मिनीटांच्या अंतराने दोन आत्मघाती बॉम्बस्फोट झाले. या स्फोटात सुमारे 21 नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. यामध्ये फ्रान्स प्रेस एजन्सीचे मुख्य फोटोग्राफर शाह मराई व आणखी तीन पत्रकारांचाही समावेश आहे. अशी माहिती तेथील आरोग्य मंत्र्यांनी दिली.  

तसेच या आत्मघाती हल्ल्यात सत्तावीसहून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे प्रवक्ते वाहिद मजरूह यांनी टोलो या वृत्तसंस्थेला दिली.    

blast

पहिला स्फोट झाल्यानंतर काही मिनीटांच्या कालावधीने दुसरा स्फोट झाला. दुसऱ्या स्फोटात त्या जागेवर असलेल्या पत्रकारांना लक्ष करण्यात आले, असे पोलिस अधिकारी काबूल हाश्मत स्टॅनिक्झाई यांनी सांगितले. पहिल्या स्फोटात आत्मघाती हल्लेखोर हा मोटरसायकलवर आला व या हल्ल्यात डावीकडे उभे असलेले 4 जण मारले गेले, तर 5 जण गंभीर जखमी झाले. पहिला हल्ला हा सकाळी आठच्या आधी अफगाणिस्तान गुप्तचर यंत्रणेच्या मुख्यालयाबाहेर झाला.

अफगाणिस्तानी सरकारने तालिबानी दहशतवाद्यांना शांततेसाठी प्रस्ताव पाठवला होता, पण त्याच्या दुसऱ्याच दिवशी हा हल्ला झाल्याने संशयाची पाल चुकचुकत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suicide bomb blast in kabul 21 died including journalist