काश्‍मीरमधील "अत्याचारीं'ना धडा शिकवा: इराणचे सर्वोच्च नेते

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 जून 2017

पश्‍चिम आशियामध्ये सध्या तणावग्रस्त परिस्थिती असून येमेन व बहारीन या देशांमधील इराणी हितसंबंधांच्या पार्श्‍वभूमीवर खामेनी यांच्याकडून या देशाचा उल्लेख होणे अत्यंत संवेदनशील मानले जात आहे. मात्र याबरोबरच खामेनी यांनी काश्‍मीरचाही उल्लेख केल्याने विविध अंदाज व्यक्त करण्यात येत आहे

नवी दिल्ली - ""बहारीन, काश्‍मीर, येमेन येथील जनतेस मुस्लिम जगाने खुलेपणाने पाठिंबा द्यावयास हवा. रमजानच्या पवित्र महिन्यातही लोकांवर अत्याचार करणाऱ्यांना मुस्लिमांनी ठाम विरोध करावयास हवा,'' अशा आशयाचे ट्‌विट इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्लाह अली खामेनी यांनी केले आहे.

खामेनी यांच्या ट्‌विटमध्ये काश्‍मीरचाही उल्लेख असल्याने त्यांना अपेक्षित असलेले "अत्याचारी' नेमके कोण आहेत, याबद्दल आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

पश्‍चिम आशियामध्ये सध्या तणावग्रस्त परिस्थिती असून येमेन व बहारीन या देशांमधील इराणी हितसंबंधांच्या पार्श्‍वभूमीवर खामेनी यांच्याकडून या देशाचा उल्लेख होणे अत्यंत संवेदनशील मानले जात आहे. मात्र याबरोबरच खामेनी यांनी काश्‍मीरचाही उल्लेख केल्याने विविध अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. या ट्‌विटच्या पार्श्‍वभूमीवर भारत व सौदी अरेबियामधील सध्याचे उत्तम संबंध, इराणमधील तेल प्रकल्प विकसित करण्यासंदर्भात भारत व येथील सरकारमध्ये उघड झालेले मतभेद यांखेरीज इतर मुद्देही विचारात घेणे आवश्‍यक असल्याचे मानले जात आहे.
 

Web Title: Support Kashmiris against ‘tyrants’: Iran’s Khamenei