esakal | सर्वोच्च न्यायालयाची इम्रान यांना नोटीस
sakal

बोलून बातमी शोधा

court

पंजाब सरकारविरुद्धच्या खटल्याबाबत न्या. काझी फैझ इसा यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान पद हे एका विशिष्ट गटासाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी असते. अशावेळी इम्रान राज्याच्या निधीचा गैरवापर का करीत आहेत.

सर्वोच्च न्यायालयाची इम्रान यांना नोटीस

sakal_logo
By
वृत्तसंस्था

इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नोटीस बजावली. त्यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षाच्या इन्साफ लॉयर्स फोरम या कायदेविषयक शाखेने नऊ ऑक्टोबर रोजी एक कार्यक्रम आयोजीत केला होता. त्यासाठी सार्वजनिक निधीचा वापर झाल्याचा आरोप आहे. त्या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पंजाब सरकारविरुद्धच्या खटल्याबाबत न्या. काझी फैझ इसा यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान पद हे एका विशिष्ट गटासाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी असते. अशावेळी इम्रान राज्याच्या निधीचा गैरवापर का करीत आहेत.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

इम्रान यांनी या कार्यक्रमात माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर टीका केली. शरीफ यांनी लष्कर हे पंजाब प्रांताचे पोलीस खाते असल्याप्रमाणे कारभार करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप इम्रान यांनी केला.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा