अमेरिकेत वृत्तपत्राच्या कार्यालयात अंदाधुंद गोळीबार,५ ठार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 29 जून 2018

मेरिलँड - मेरिलँड मधील अनापोलिस येथे कॅपिटल गॅझेट या वृत्तपत्राचे कार्यालय आहे. या कार्यालयात हा गोळीबार झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी एकास अटक केली असून, जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी संपूर्ण इमारत ताब्यात घेतली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हल्ल्याची माहिती देण्यात आली आहे.

कॅपिटल गॅझेटचे एक पत्रकार फिल डेव्हिस यांनी ट्विटरवर याची माहिती दिली. एक बंदुकधारी व्यक्तीने दरवाज्यातून कर्मचाऱ्यांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये अनेक लोक ठार झाले आहेत.

सीबीएस न्यूजने दिलेल्यय माहितीनुसार, किमान चार लोक ठार झाल्याचे म्हटले आहे. कॅपिटल गॅझेटचे कार्यालय एनापोलिसच्या चार मजली इमारतीत आहे. अनापोलिस अमेरिकेतील मेरिलँड राज्याची राजधानी आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना याबाबत माहिती देण्यात आल्याचे व्हाईट हाऊसने म्हटले आहे. याबात त्यांनी ट्विट केले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suspect in Maryland newspaper shooting had sued Capital Gazette for defamation