फिलिपिन्सच्या तुरुंगावर हल्ला; 158 कैदी फरार

वृत्तसंस्था
बुधवार, 4 जानेवारी 2017

किडपवन (फिलिपिन्स)- येथील एका तुरुंगावर संशयित बंडखोरांनी हल्ला केल्यानंतर दीडशेहून अधिक कैदी तुरुंगातून पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार येथे घडला. यावेळी बंदुकधारी हल्लेखोरांशी पोलिसांची चकमक झाली, त्यामध्ये किमान सहाजण मारले गेल्याचे वृत्त आहे. 

अलीकडच्या काळातील तुरुंग फोडण्याचा हा फिलिपिन्समधील सर्वांत मोठा प्रकार आहे. अनेक बंदुकधारी हल्लेखोरांनी नॉर्थ कोटाबाटो जिल्हा तुरुंगावर हल्ला केल्यावर पोलिस आणि हल्लेखोरांमध्ये जोरदार चकमक सुरू झाली. त्यामध्ये एक सुरक्षारक्षक मृत्युमुखी पडला असून, तुरुंगातील एक कैदी जखमी झाला, अशी माहिती प्रांतीय तुरुंग अधिकारी पीटर जॉन बाँगन्गट यांनी दिली. 

कोटाबाटो प्रांतातील किडपवन शहर हे फिलिपिन्सची राजधानी मनिलापासून 930 किलोमीटर अंतरावर आहे. 
'तुरुंगावर हल्ला झाल्यानंतर येथे काही तास चकमक सुरू होती. हल्ल्यानंतर लष्कराच्या तुकड्या आणि पोलिसांनी संयुक्तपणे सशस्त्र वाहने घेऊन बाजूच्या जंगलात पळून गेलेल्या कैद्यांचा व त्या हल्लेखोरांचा कसून शोध घेतला,' असे बाँगन्गट आणि पोलिसप्रमुख लिओ अजेरो यांनी सांगितले. 
 
Web Title: Suspected rebels storm Philippine jail; 158 inmates escape