
Swiss Bank : स्वीस कोर्टाकडून बँक अधिकारी दोषी
मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या मित्राला स्वीस बँकेत मोठी रक्कम जमा करण्यास परवानगी देणाऱ्या चार बँक अधिकाऱ्यांना स्वीस न्यायालयाने दोषी ठरविण्यात आले आहे. योग्य खबरदारी घेतली नसल्याचा ठपका त्यांच्यावर लावला आहे.
रशियाच्या गाझप्रोम बँकेच्या झुरिच शाखेचे माजी कार्यकारी अधिकाऱ्यांना सात महिने निलंबनाची शिक्षा दिली आहे. वादक सर्जी रोल्डगीन यांना मदत केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. रोल्डगीन हे पुतीन यांचे घनिष्ठ मित्र आहे.
‘पुतीन्स वॉलेट’ या टोपण नावाने ते ओळखले जातात. २०१४ ते २०१६ या काळात त्यांनी ५० हजार डॉलर बँकेत जमा केले होते. एवढी मोठी रक्कम कोठून आणली याचे कोणतेही विश्वसनीय कारण त्यांनी दिले नव्हते. रॉल्डगीन हे सेलेस्ट वादक असून पुतीन यांची ज्येष्ठ कन्या मारिया हिचे ते मार्गदर्शक आहेत.
स्वीस कायद्यानुसार खातेदार किंवा पैशांच्या स्रोताविषी संशय असल्यास बँकांना खाती नाकारणे किंवा बंद करणे आवश्यक आहे. शिक्षा झालेल्या चार बँक अधिकाऱ्यांपैकी तीन जण रशियाचे आहेत तर एक स्वित्झर्लंडमधील आहे. दोषींची नावे गोपनीय ठेवण्यात आली आहेत. स्वीस न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध ते आव्हान याचिका दाखल करणार आहेत.