लहान मुले तडफडून मेली; सगळीकडे हाहाकार...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

आम्ही अवतीभोवती श्‍वास गुदमरुन मृत्युमुखी पडणारे नागरिक पाहिले. लहान मुलांनाही अशाच प्रकारे मरण येताना पाहणे अत्यंत वेदनादायी होते. आम्ही त्यांना काहीही मदत करु शकलो नाही

दमास्कस - सीरियामधील इडलिब प्रांतामध्ये घडविण्यात आलेल्या रासायनिक शस्त्रास्त्रांच्या भीषण हल्ल्यांमधून बचावलेले नागरिक अद्यापी प्रचंड मानसिक धक्‍क्‍यामध्ये असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

""आम्ही अवतीभोवती श्‍वास गुदमरुन मृत्युमुखी पडणारे नागरिक पाहिले. लहान मुलांनाही अशाच प्रकारे मरण येताना पाहणे अत्यंत वेदनादायी होते. आम्ही त्यांना काहीही मदत करु शकलो नाही,'' अशी प्रतिक्रिया ओथमान अल - खतानी या प्रत्यक्षदर्शीने या पार्श्‍वभूमीवर बोलताना व्यक्‍त केली. इडलिब प्रांतात करण्यात आलेल्या रासायनिक हल्ल्यांत किमान 70 ठार; तर 557 जखमी झाले आहेत. संयुक्‍त राष्ट्रसंघाने या घटनेची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.

"सकाळी सुमारे साडेसहा वाजावयाच्या सुमारास पहिला हल्ला झाला; तेव्हा बहुसंख्य जण निद्राधीन होते. कोणालाही या हल्ल्याच्या प्रलयंकारी स्वरुपाची कल्पना नव्हती. आम्ही घटनास्थळी पोहोचल्यानंतर सगळीकडे मृतदेहांचा खच दिसला. आमच्या तोंडून शब्द फुटेना. कोणालाही काही सुचलेच नाही, अशी भीषण परिस्थिती उद्‌भविली होती,'' असे हनी अहमद अल कतानी यांनी सांगितले. कतानी हे सीरियात मदतकार्य करणाऱ्या संघटनेचे स्वयंसेवी कार्यकर्ते आहेत. 

बंडखोर आणि सरकारी फौजा यांच्या देशांतर्गत संघर्षात पिचलेल्या सीरियात नुकताच रासायनिक हल्ला झाला आहे. सीरिया सरकारने केलेल्या रासायनिक हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणूनअमेरिकेने सीरियात हवाई हल्ले सुरू केले आहेत

Web Title: Syria bleeds in a gas attack