तैवान भूकंपातील मृतांची संख्या 9 वर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

बचावकार्यादरम्यान कर्मचाऱ्यांना भूकंपानंतरच्या झटक्‍यांचा (आफ्टरशॉक) सामना करावा लागल्याची माहिती सूत्रांनी दिली. 6.4 रिश्‍टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपामुळे मोठी पडझड झाली असून, अद्याप अनेकजण बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे

हुआलिन - तैवानला मंगळवारी बसलेल्या भुकंपाच्या जोरदार धक्‍क्‍यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 9 वर पोचली असून, गुरुवारी बचावकार्य करणाऱ्या पथकांच्या हाती आणखी दोन मृतदेह लागले आहेत.

बचावकार्यादरम्यान कर्मचाऱ्यांना भूकंपानंतरच्या झटक्‍यांचा (आफ्टरशॉक) सामना करावा लागल्याची माहिती सूत्रांनी दिली. 6.4 रिश्‍टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपामुळे मोठी पडझड झाली असून, अद्याप अनेकजण बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: taiwan earthquake

टॅग्स