
दृष्टिक्षेपात
बीजिंग - चीनमधील ज्या वुहान शहरात कोरोनाचा उद्रेक झाला त्या शहरापासून तैवानची राजधानी तैपेई केवळ साडेनऊशे किलोमीटर अंतरावर आहे तर अमेरिकेतील न्यूयॉर्क हे शहर बारा हजार किलोमीटरपेक्षाही अधिक अंतरावर. अमेरिकेची वाताहत झाली असताना छोट्याश्या तैवानने चमत्कार केला.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
येथील संसर्ग तर कमी झालाच आहे पण मृतांचा आकडाही जेमतेमच आहे. तैवानमध्ये ४५३ लोकांना बाधा झाली असून फक्त सातजण मरण पावले आहेत.
विशेष म्हणजे तैवानने केवळ शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक सण समारंभांना काही काळासाठी ब्रेक लावला होता. याचे सारे श्रेय जाते ते या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती साई वेन्ग इन यांना. पुढील पंचसूत्रीच्या आधारावर त्यांनी ही लढाई यशस्वीरित्या जिंकून दाखविली. यामुळे अन्य देश आता तैवानच्या प्रेमात पडले असून याच मॉडेलचा सर्वत्र अवलंब केला जावा म्हणून कॅनडा, इस्राईल, जर्मनी आणि अमेरिकेने देखील याच मॉडेलचा आग्रह धरला आहे.
भारतात तब्बल ७ हजार कोटींची गुंतवणूक; कसा टाकणार चीनी वस्तूंवर बहिष्कार?