तालिबानच्या हल्ल्यात 37 जण ठार 

In Taliban attack, 37 people died
In Taliban attack, 37 people died

काबूल (पीटीआय) : अफगाणिस्तानातील सरकारी सुरक्षा दलांवर तालिबानच्या दहशतवाद्यांनी केलेल्या वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये आज सुमारे 37 जण मृत्युमुखी पडले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

कुंडूझ प्रांतीय सरकारचे प्रमुख असलेले मोहंमद युसूफ यांनी सांगितले, की दश्‍ती आर्ची जिल्ह्यातील सुरक्षा दलांच्या एका चौकीवर तालिबानकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात 13 सैनिक मारले गेले, तर दुसऱ्या एका हल्ल्यात 15 सैनिक जखमी झाले. तालिबान आणि सुरक्षा दलांमध्ये रविवारी उशिरा सुरू झालेला संघर्ष सोमवारी सकाळीही सुरू होता. 

जोज्वान प्रांतातही तालिबानकडून सुरक्षा दलांवर मोठा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या हल्ल्यात आठ पोलिस मृत्युमुखी पडले असून, तीन जण जखमी झाले. तालिबानचे सात बंडखोरही या वेळी ठार झाल्याचे समजते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com