अफगाणिस्तान: भारताने बांधलेल्या धरणाजवळ तालिबानचा हल्ला

वृत्तसंस्था
रविवार, 25 जून 2017

चिश्‍त जिल्ह्यामधील सलमा धरणाजवळील चौकीवर तालिबानने हल्ला चढविला. पोलिसांवर गोळीबार करुन दहशतवादी फरार झाले

काबूल - अफगाणिस्तानमधील हेरात प्रांतामध्ये भारताकडून बांधण्यात आलेल्या "सलमा' धरणाजवळ तालिबानकडून चढविण्यात आलेल्या हल्ल्यात येथील पोलिस दलाचे किमान 10 जवान ठार झाले. यावेळी झालेल्या लढाईत पाच दहशतवादीही ठार झाले.

"चिश्‍त जिल्ह्यामधील सलमा धरणाजवळील चौकीवर तालिबानने हल्ला चढविला. पोलिसांवर गोळीबार करुन दहशतवादी फरार झाले,'' असे एका सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले.

अफगाणिस्तानमध्ये अमेरिका व नाटो गटाचे सैन्य कमी होत असतानाच तालिबानचा प्रभाव मात्र वेगाने वाढत आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांनी या पार्श्‍वभूमीवर बोलताना तालिबानला पुन्हा एकदा चर्चा करण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Taliban attacks an Indian build dam in Afghanistan