तालिबानी सत्तेकडून मनोरंजनाची ‘ऐशीतैशी’

कडक नियम लागू; वाद्ये बाळगण्यासही बंदी
तालिबानी सत्तेकडून मनोरंजनाची ‘ऐशीतैशी’
तालिबानी सत्तेकडून मनोरंजनाची ‘ऐशीतैशी’sakal media

काबूल : पंधरा ऑगस्टला काबूलवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानकडून मानवाधिकारांचे सातत्याने उल्लंघन केले जात आहे. आता तालिबानने मनोरंजन माध्यमावर बंदी आणण्याची तयारी सुरू केली. अफगाणिस्तानात गेल्या पंधरा वर्षात मनोरंजनाचे अनेक साधने उपलब्ध झालेली असताना आता ते हळूहळू नष्ट करण्याचे काम केले जात आहेत.

तालिबानच्या कडक नियमानुसार संगीत रजनीच्या आयोजनावर, वाद्ये बाळगण्यावर आणि पार्ट्यांवर बंदी घालण्यात आली. काबूलसह अनेक शहरात एअरवेब, टिव्ही स्क्रीन, संगीत शाळा, चित्रपटगृहे बंद झाली आहेत. मागच्या राजवटीत तालिबानने हिंसेचा मार्ग अवलंब करत वाद्ये नष्ट केले होते. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना चाबकाचे फटके दिले होते. त्यानंतर नागरिकांनी कॅसेट आणि सिडी घरातच लपवून ठेवल्या. परंतु तालिबानच्या झाडाझडतीत कॅसेट आढळल्यानंतर त्यांना शिक्षा दिल्याचे प्रकार घडले. अफगाणिस्तानवर देखरेख करणाऱ्या तज्ञांच्या मते, तालिबानच्या स्वभावात बदल झालेला नाही. तालिबान पुन्हा जुनीच राजवट लागू करण्याचा प्रयत्न करत आहे.

एरियाना चित्रपटगृह ओस पडले

काबूल शहरात १९६० च्या दशकात सुरू झालेले एरियाना चित्रपटगृहात आता शिट्या, टाळ्यांचा आवाज ऐकू येत नाही. गेल्या सहा दशके अफगाणिस्तानच्या नागरिकांचे मनोरंजन करणारे एरियाना तालिबानच्या राजवटीत बंद पडले. अफगाणिस्तानातील युद्ध, सांस्कृतिक बदलाचे साक्षीदार असलेले एरियानाबाहेर असलेले हिंदी आणि अमेरिकी चित्रपटांचे पोस्टर्स काढून टाकले आहेत. दरवाजावर कुलूप लावले आहेत. एरियाना आणि अन्य चित्रपटगृहे बंद करण्याचे आदेश तालिबानने काढले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com