अफगाणिस्तान: तालिबान्यांनी ठेवले 100 नागरिकांना ओलिस

सोमवार, 20 ऑगस्ट 2018

आज (ता. 20) दहशतवाद्यांनी तीन बस अडवल्या होत्या व प्रवाशांना ओलिस ठेवले होते, अशी माहिती कुंदूज प्रांताचे प्रमुख मोहम्मद अयुबी यांनी दिली. तालिबानी या हल्ल्याचे आयोजन करून आधीच झाडांमध्ये दबा धरून बसले होते. त्यांना सरकारी कर्मचारी व सुरक्षारक्षकांना ओलिस ठेवायचे होते.  

काबूल : उत्तर अफगाणिस्तानातील आबाद जिल्ह्यात 100 हून अधिक लोकांना तालिबानी दहशतवाद्यांनी ओलिस ठेवले आहे. ईद-उल-अजहाच्या सणाच्या काही दिवस आधी राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी शस्त्रसंधीचे आवाहन केले होते, असे असूनही सर्व मागण्या धुडकावून तालिबान्यांनी लोकांना ओलिस ठेवले. यात महिला व लहान मुलांचा समावेश आहे. 

आज (ता. 20) दहशतवाद्यांनी तीन बस अडवल्या होत्या व प्रवाशांना ओलिस ठेवले होते, अशी माहिती कुंदूज प्रांताचे प्रमुख मोहम्मद अयुबी यांनी दिली. तालिबानी या हल्ल्याचे आयोजन करून आधीच झाडांमध्ये दबा धरून बसले होते. त्यांना सरकारी कर्मचारी व सुरक्षारक्षकांना ओलिस ठेवायचे होते.  

तालिबांन्यांनी या हल्ल्याची जबाबदारी घेतली नसली, तरी हा भाग तालिबानी दहशतवाद्यांच्या नियंत्रणाखाली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.