टांझानियामध्ये रहस्यमय आजार; रक्ताच्या उलट्या झाल्यानंतर अनेकांचा मृत्यू

Tamzania.jpg
Tamzania.jpg

नवी दिल्ली- टांझानियामध्ये एका रहस्यमयी आजाराने खळबळ उडवून दिली आहे. या अज्ञात आजाराने ग्रस्त असलल्या लोकांना रक्ताच्या उलट्या होत असून आतापर्यंत यामुळे 15 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत या आजारामुळे 50 जण बाधित झाल्याचे सांगण्यात येते. याचदरम्यान टांझानिया सरकारने हा रहस्यमयी आजार उजेडात आणणाऱ्या चुन्या जिल्ह्याच्या मुख्य आरोग्य अधिकारी फेलस्तिा किसांद यांना निलंबित केले आहे. 

किसांदू म्हणाल्या होत्या की, लोकांना झालेल्या आजारावर उपचार करत असताना त्यांच्या रक्ताचे नमुने पाठवण्यात आले आहेत. परंतु, टांझानियाच्या आरोग्य मंत्रालयाने मात्र कोणत्याच प्रकोपाचे संकेत नसल्याचे म्हटले आहे. यावर मंत्रालयाने अनावश्यक भीती निर्माण केल्याप्रकरणी किसांदू यांना निलंबित केले आहे. यावर किसांदू यांनी तुर्कीच्या अनादोलू वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले होते की, रुग्णांमध्ये सर्वाधिक पुरुषांचा समावेश आहे. त्यात ज्यांना पोट आणि अल्सरचा त्रास झाला, त्यांना सिगारेट तसेच मद्यप्राशन टाळण्यास सांगण्यात आले होते. 

किसांदू म्हणाल्या की, हे मृत्यू इफूम्बोच्या एका वॉर्डात झाले आहेत. या वॉर्डमध्ये दाखल रुग्णांचा रक्ताच्या उलट्या झाल्याने मृत्यू झाला आहे. दुसरीकडे टांझानियाचे आरोग्य मंत्री डोरोथी ग्वाझिमा यांनी या प्रकाराकडे जास्त लक्ष देण्याची गरज नसून किसांदू यांना लोकांमध्ये भीती निर्माण केल्याच्या आरोपाखाली 10 दिवसांसाठी निलंबित करण्यात आले असल्याचे म्हटले. 

आरोग्य मंत्र्यांनी म्हटले की, मेडिकल कौन्सिलला संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले आहे. परंतु, महामारी पसरली नसल्याचा दावाही त्यांनी केला. वर्ष 2018 मध्येही अशाच प्रकारचा आजार पसरला होता. अनेक लोकांना ताप, उलटी आणि पोटात वेदना होत होत्या. दुसरीकडे टांझानियात कोरोना विषाणूवरुन राष्ट्रपती जॉन मागूफुली यांच्यावर बेजबाबदारपणाचा आरोप करण्यात आला आहे. प्रार्थनेमुळे टांझानियात कोरोनाचा प्रकोप थांबला असल्याचा दावा राष्ट्रपतींनी केला होता. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com