नेपाळ : 'तारा एअरलाइन'चे विमान बेपत्ता; 4 भारतीयांसह 22 प्रवासी विमानात

Tara Air Aircraft, Nepal
Tara Air Aircraft, Nepalesakal
Summary

नेपाळमध्ये तारा एअरच्या विमानाचा संपर्क तुटला आहे.

काठमांडू : नेपाळमध्ये तारा एअरच्या विमानाचा (Tara Air Aircraft, Nepal) संपर्क तुटलाय. रविवारी सकाळी विमानानं उड्डाण केलं होतं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तारा एअरच्या दुहेरी इंजिनच्या विमानानं आज सकाळी पोखराहून (Pokhara) जोमसोमला उड्डाण केलं. विमानाशी शेवटचा संपर्क सकाळी 9.55 वाजता झाला. अधिका-यांनी पुढं सांगितलं की, 'विमान फक्त 15 मिनिटांच्या उड्डाणावर होतं आणि त्यात 22 प्रवासी होते.'

नेपाळमधील स्थानिक माध्यमांनुसार, बेपत्ता विमानात 4 भारतीय आणि 3 जपानी नागरिकही आहेत. उर्वरित सर्व नेपाळी नागरिक होते. शिवाय, विमानात चालक दलासह एकूण 22 प्रवासी आहेत. दरम्यान, अधिकारी सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचं कळतंय.

Tara Air Aircraft, Nepal
कर्नाटकहून अयोध्येला जाणाऱ्या मिनी बसचा भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत 7 ठार

जोमसोम (Jomsom) हा डोंगराळ भाग ट्रेक करणाऱ्या परदेशी गिर्यारोहकांसाठी एक लोकप्रिय मार्ग आहे. येथील पूज्य मुक्तिनाथ मंदिराला मोठ्या संख्येनं भारतीय आणि नेपाळी यात्रेकरू भेट देत असतात. नेपाळच्या गृह मंत्रालयाचे प्रवक्ते फदिंद्र मणि पोखरेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रालयानं बेपत्ता विमानाचा शोध घेण्यासाठी पोखरा येथून मुस्तांग आणि दोन खासगी हेलिकॉप्टर तैनात केले आहेत. शोधासाठी नेपाळ लष्कराचे हेलिकॉप्टर तैनात करण्याची तयारीही सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com